विश्व मानव रुहाणी केन्द्र शाखा दहिवद तर्फे सुळे गावात २७ नोव्हेंबर २०२२ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन




शिरपूर: विश्व मानव रुहाणी केन्द्र शाखा दहिवद तर्फे सुळे गावात २७ नोव्हेंबर २०२२ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्व मानव रुहाणी केन्द्र ही (नोंदणीकृत ) एक संपूर्ण लाभकारी, परोपकारी आणि अध्यात्मिक संस्था आहे. ही संस्था संत बलजितसिंहजी यांनी शिकवलेले नैतिक जीवन अध्यात्म आणि ध्यानधारणा यावर आधारित कार्यक्रम आणि लोककल्याण साठी विविध प्रकारच्या सामाजिक कार्याचे आयोजन करते. जागतिक महामारी कोव्हीड- १९ च्या काळातही विविध राज्यामध्ये संस्थेतर्फे धर्मदाय कार्य पूर्ण उर्जा व उत्साहाने करण्यात आले.

या संदर्भात दि. २७ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी विश्व मानव रुहाणी केन्द्र नवानगर शाखा दहिवद ता. शिरपूर जि. धुळे यांच्या वतीने सुळे ता. शिरपूर जि. धुळे या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सदर ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहेत. तरी सुळे गावातील व परिसरातील गरजू व्यक्तीनी लाभ घ्यावा असे आवाहन विश्वरूहणी मानव केंद्राचे उपाध्यक्ष तथा शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा व सेवक वर्ग यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने