इंदापूर भाजप युवा मोर्चाने जोरदार घोषणाबाजी करीत खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात केले आंदोलन प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अवमानकारक व खोटा बदनामीकारक इतिहास सांगून सावरकरांचा व हिंदु प्रेमींचा अवमान केल्याबद्दल  राहुल गांधी यांच्यविरोधात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर भारतीय जनता युवा मोर्चाचे कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर भाजयुमोच्या वतीने इंदापूर नगरपरिषद समोर  'जोडे मारो आंदोलन' करुन निषेध व्यक्त करण्यात आला.
   यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खासदार राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपले विधान त्वरित मागे घ्यावे आणि माफी मागावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा यावेळी इशारा देण्यात आला.
    या प्रसंगी युवा वॉरियर्स चे पश्चिम महाराष्ट्र सहसयोजक प्रशांत गलांडे -पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पवार, राम आसबे, पृथ्वीराज  जगताप, गणेश भांडवलकर, मयूर देवकर, सचिन जाधव, निखिल मगर यांच्या सह भाजयुमो पदाधिकारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने