धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील जवान मनोज गायकवाड यांना जम्मू काश्मीर येथे विरमरण*






जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असतांना अतिबर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमखल्लनामुळे धुळे तालक्यातील चिंचखेडा गावातील जवान मनोज गायकवाड यांना विरमरण आल्याची दुर्दैवी घटना घडली असून,त्यांच्यासोबत आणखी दोन जवानांना विरमरण आले आहे.या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली.चिंचखेडा येथील जवान मनोज लक्ष्मण गायकवाड वय (४२) हे गेल्या २१ वर्षापासून  सेवा बजावत असून सैन्यात मूळ युनिटमध्ये ५६ राष्ट्रीय रायफल जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असतांना दि.१८ रोजी अती बर्फवृष्टीमुळे झालेल्या हीमखल्लनामुळे तेथे अडकले होते,त्यानंतर मनोज गायकवाड यांना हवामानाच्या दुष्परिणामामुळे होत असलेल्या शारीरिक त्रासामुळे तातडीने हवाईमार्गाने पुढील उपचाराकरिता १६८ सेना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते,त्यांची शारीरिक तपासणी नंतर त्यांना मयत घोषित करण्यात आले.मनोज गायकवाड यांच्यासह आणखी सौविक हाजरा,मुकेश कुमार यांनाही विरमरण आले,शहीद जवान मनोज गायकवाड यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,आई,वडील, व दोन भाऊ असा परिवार होता.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने