शिरपूर तालुक्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून गावा-गावांतील ग्रामस्थांना राहण्यासाठी जागाच नाही. एका मोठ्या कुटुंबाचे विभाजन होऊन त्यांचे ५-६ कुटुंबात रुपांतर झालेले आहेत. आता अशा कुटुंबांना गावात रहायला जागा उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच ग्रामस्थांनी गायरान जागेत घरकुल व झोपड्या बांधून आपला संसार मागील बऱ्याच वर्षापासून थाटला आहे.
आता अशा कुटुंबाना त्यांच्या राहत्या जागेवरून काढायचे तर एवढ्या कुटुंबांनी जायचे कुठे? प्रशासन त्यांच्या निवाऱ्याची सोय इतरत्र करणार आहे का? असे प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहेत त्या संदर्भात आज शिरपूर तालुका सरपंच महासंघाचे शिष्ठमंडळ प्रांत साहेबांना भेटले.
तसेच विनंती करण्यात आली की शिरपूर तालुक्यातील गावा-गावांतील गायरान जागेवरील जुने पक्के घरे व घरकुल बांधकाम झालेल्या ग्रामस्थांना त्यांचा निवाऱ्याच्या जागा नियमाकूल करण्यात याव्यात याबाबत प्रांत साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली.
कोर्टाचा आदेश असल्याकारणाने यात प्रशासन पातळीवर निर्णय घेणे अडचणीचे होईल अशी स्पष्टॊक्ती प्रांत यांनी दिली. तरी वरिष्ठासोबत चर्चा करू असे आश्वासन देण्यात आले.
*यावेळी पं स सदस्य चंद्रकांत पाटील मांडळ चे सरपंच सुनिल माळी, सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, अजंदे सरपंच तथा सरपंच महासंघ तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, कळमसरे सरपंच रविंद्र राजपूत, शिंगावे माजी सरपंच लोटन हिम्मत पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोविंदा थोरात, सरपंच महासंघ तालुका संपर्क प्रमुख तथा शिंगावे उपसरपंच चंद्रकांत (भुरा) पाटील उपस्थित होते.
