प्रदिप ढुके यांची मावळा जवान संघटनेच्या बारामती तालुकाध्यक्षपदी निवड प्रतिनिधी दत्ता पारेकर





पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जोपासणारी संघटना म्हणून मावळा जवान संघटनेची ओळख संपुर्ण महाराष्ट्रात असुन नुकतेच  या संघटनेच्या बारामती तालुकाध्यक्षपदी श्री प्रदिप गोरख ढुके यांची निवड करण्यात आली. 
या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष , इतिहास संशोधक, लेखक श्री दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते प्रदिप ढुके यांना निवडपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दारवटकर, युवक अध्यक्ष रोहित नलावडे, अश्विनीकुमार पत्की,शेखर जाधव, प्रकाश सातव,  हरी खरात, नितीन मांडगे,दत्तात्रय हरिहर,प्रकाश चंदनशिवे,रमेश मरळ(देशमुख)आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांचे संघटन करून, गडकोट संवर्धन, छत्रपती शिवरायांच्या विश्ववंदनिय कार्याचा प्रसार करण्याचा शुभारंभ प्रदिप ढुके यांनी सिंहगड येथे शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संकल्प सुरू केला ,यावेळी बारामती महिला  शहराध्यक्षा, अखिल भारतीय मराठा महासंघच्या अर्चना  सातव  यांनी मार्गदर्शन केले .या कामी बारामतीमधुन अनेक गडप्रेमी हजर होते.श्री अश्विनीकुमार पत्की यांनी सूत्रसंचालन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने