शहरातील वाल्मीक नगर परिसरात किरकोळ वादातून दोन गटांवर दंगलीचा गुन्हा दाखल




शिरपूर(प्रतिनिधी) शहरातील वाल्मिक नगर मध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तुफान हाणामारीची घटना घडली असून शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 26 जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे याप्रकरणी 
लताबाई आबा कोळी  रा. वाल्मिकनगर शिरपुर या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नगर मधील दगडू किराणा दुकानासमोर मुलाने कुत्र्यास दगड मारला असता एकाला लागला दगड लागल्याने तु मला दगड का मारला असा जाब विचारत हाताबुक्यांनी मारहाण करून त्यांनी गैरकायद्याची गर्दी जमवून भांडण सोडविण्यासाठी आलेल्या नागेश अशोक कोळी,किरण शांताराम कोळी,योगेश कोळी, अविनाश कोळी,आरती कोळी व फिर्यादीच्या मुलास राहुल आबा कोळी यांना त्याच्या हातातील लाकडी दांडक्यांनी हाताच्या दंडावर, पाठीवर मारून दुखापती करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली.



         दाखल तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात सुदर्शन युवराज गोसावी, राकेश राजधर कोळी,विक्की मनोहर कोळी,राहुल संतोष कोळी,शैलेश राजधर कोळी, सुंनदा मनोहर कोळी,विजय संतोष कोळी,प्रशांत युवराज कोळी,चेतन पांडुरंग बुवा भैय्या राजधर कोळी,जितेंद्र मनोहर कोळी सर्व रा. वाल्मिकनगर शिरपुर यांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याचा पूढील तपास पोना विनोद सरदार करीत आहे.
         तर तर सुनंदाबाई मनोहर शेंगदाणे या महिलेने दुसरी फिर्याद दाखल केले आहे दाखल फिर्यादीनुसार दगडू किराणा दुकानासमोर मुले उभे असताना त्यांना दगड मारत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस वाल्मिक नगरमधील गड्या कोळी याने कानशिलात लगावून धक्का देऊन जमिनीवर पाडल्याने व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या व भारतीबाई प्रकाश कोळी, भिकुबाई जगन कोळी व भास्कर लुका कोळी यांना गड्या दिलीप कोळी, अविनाश कैलास कोळी, किरण शांताराम कोळी, नागेश संजय कोळी,राजेश कैलास कोळी, राकेश कैलास कोळी, वाल्मीक देविदास कोळी,दत्तू भिल,दिनेश कोळी,लताबाई आबा कोळी, कीर्तीबाई रवींद्र कोळी,दादू संतोष कोळी,व भटू कोळी अश्यांनी गैर कायद्याची गर्दी जमवून लाठ्याकाठ्यांनी आणि बुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली याप्रकरणी 15 जणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात पूढील तपास हवालदार राजेश शिरसाठ करीत आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने