महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राज साहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन व व अमित साहेब ठाकरे यांचे युवा नेतृत्व पाहून शिरपूर तालुक्यातील युवकांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आकर्षित होत असून तालुक्यातील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणे सुरू केले आहे.
आज दि. १७ नोव्हेंबर रोजी शिरपूर तालुक्यातील सुभाष पाटील, भूषण पाटील, किसन पाटील, वैभव सोनवणे, वैभव कोळी, हर्षल बोरसे, पवन हटकर, योगेश पाटील, ओम पाटील, विजय राजपूत, विवेक पवार, विवेक पाटील, सागर कोळी, इमान पिंजारी, दिलीप पाटील, अरमान पिंजारी,सनी पाटील, हरून पिंजारी, दीपक पाटील, पप्पू धोबी, निलेश मोरे, राहुल सोनवणे, राहुल पाटील, सागर सावडे, अभिषेक पाटील, इत्यादी तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात ज्यांनी पक्षप्रवेश घडवून आणला ते राकेश लोटन पाटील यांना शिरपूर तालुका उपाध्यक्ष पदी आज निवड करण्यात आली
यावेळी कार्यक्रमास उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी व विजय शुक्ला यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या तरुणांचे स्वागत करून मनसे चा झेंडा खांद्यावर देत अन्यायाविरोधात लढून जनतेला, विद्यार्थ्यांना महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत रहावा, राजसाहेब व पक्षाचे विचार घराघरात पोहचवावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक बाबत युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमास मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष राकेश नवनीत चौधरी, मनसे जिल्हा प्रवक्ता विजय शुल्कला, मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमंचद आनंदा मोरे, मनसे शिरपूर शहर अध्यक्ष चेतन राजपूत, मनविसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष सोनू राजपूत, ता. उपाध्यक्ष अजय सोनवणे, ता.सहसचिव अमोल गुजर, विखरण गट अध्यक्ष प्रवीण गुरव, योगेश पाकडे,आदी उपस्थित होते.

