बोराडी-वाघाडी रस्त्याची दुरवस्था.* *संबंधित विभागाचे दुर्लक्ष : खराब रस्त्यामुळे अपघात वाढले !* *बोराडी ते वाघाडीपर्यंतच्या रस्त्याची झालेली दुरवस्था* *प्रथमच प्रवाश्यांनी स्वतः वाहन रस्त्यावर थांबवून निषेध नोंदवला.*




बोराडी ता.शिरपूर वार्ताहर बोराडी ते वाघाडी या रस्त्याची दूरवस्था झाली असून हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.




बोराडी ते वाघाडी दरम्यानच्या रस्त्यावर सारखी वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. खड्डा टाळावा यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे रोजच लहान- मोठे अपघात होत आहे. वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
बोराडीसह परिसरातील आदिवासी भागातील सर्वच रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील लोक शहराकडे जाण्याचे टाळत आहेत. काही वेळेस तर ग्रामीण भागातील रुग्णांना घेऊन
जाणारी रुग्णवाहिका व इतर खाजगी वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोटरसायकल व बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना खड्ड्यांच्या दणक्यामुळे पाठीचे विकार, मणक्यांमध्ये गॅप पडणे असे अनेक विकार होत आहेत. बोराडी हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तिन्ही राज्यांना सीमेवरील गाव आहे. मध्यप्रदेशातील काही जण गुजरातकडे जाण्यासाठी बोराडी मार्गाने ये-जा करतात. परंतू रस्त्याची दुरावस्था झाल्याने अडचणी येत
आहेत. बोराडीपासून नादर्डे गावापर्यंत रस्ता खराब झाला आहे. सदर रस्त्यावरील वाहतूक रस्ता सोडून साईट पट्ट्यावरून होत असून त्यामुळे विरुद्ध दिशेने येणार वाहन समोरच्या वाहनावर केव्हा धडकेल व अपघात होईल याची शक्यता आहे. भविष्यात रस्ता दुरुस्त न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करावा. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वाहनचालक व ग्रामस्थांनी दिला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने