पुणे : महाराष्ट्रतील धनगर समाजाचे गेल्या सत्तर वर्षांपासून आरक्षण अंमलबजावणीचा विषय झुंलवत ठेवण्याचे काम राज्यकर्तेंनी केले आहे.या काळात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार आले आणि गेले.परंतु कुठल्याही सरकारला धनगर समाजाची दया आली नाही. धनगरांचा वापर फक्त मतदान करण्यापुरता होतो.कुठल्याही सरकारची मानसिकता दिसत नाही.नुकताच संभाजीनगर येथे समाजाचा आक्रोश मेळावा झाला त्याठिकाणी तीन मंत्री आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आले होते.त्यांनी फक्त आश्वासन दिले धनगर समाजाला आरक्षणासाठी सर्व मदत करणार? परंतु केव्हा करणार हे ठोस कुणी सांगत नाही.समाजाने फक्त आक्रोश करुन चालणार नाही.तर आरक्षण मिळेपर्यंत उठाव करावा लागेल त्याची सुरुवात इंदापूर तालुक्यातून झाली आहे.धनगर समाज ऐक्य परिषदचे संस्थापक डॉ. शशिकांत तंरगे यांनी पुढाकार घेतला आहे.गेल्या दहा दिवसांपासून संपुर्ण तालुक्यात घोगंडी बैठका घेऊन जनजागृती करण्याचे काम डॉ. तंरगे करीत आहेत.गेल्या दोन महिन्यापुर्वी केंद्र सरकारने पाच राज्यातील इतर जातीचे काना, मात्रा, वेलांटी अशा चुकांची दुरुस्ती करुन आरक्षण लागू केले.अर्थात केंद्र सरकार अशी चुक दुरुस्त करुन आरक्षण देऊ शकते.परंतु धनगर समाजाला का? देत नाही ते तरी सांगावे वेळोवेळी राज्य आणि केंद्र सरकारने धनगर समाजाला फसविले आहे.नेहमी फक्त आश्वासन दिले जाते.ठोस भूमिका कोणतेही सरकार घेत नाही.महाराष्ट्रात धनगड हेच धनगर आहेत फक्त अशी दुरुस्ती केंद्र सरकार का? करत नाही.राज्यातुन शिफारस पत्र का? मागुन घेत नाही.पाच राज्यांच्या चुका दुरुस्त केल्यात तसे सहावे राज्य महाराष्ट्राचे का? केले नाहीत.कारण महाराष्ट्रात धनगर आहेत धनगरांना आरक्षण द्यायचेच नाही.असाच त्याचा अर्थ होतो. म्हणून समाजाने एकजूट होऊन आरक्षणांसाठी उठाव करण्याची गरज आहे.त्याची सुरुवात धनगर ऐक्य परिषदेने केली आहे.अनेक ठिकाणी बैठका घेऊन मार्गदर्शन करुन एकदा उठाव करावाच लागेल म्हणून सोमवारी 21नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुका तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.त्यांच दिवशी संपुर्ण राज्यात जिल्हा आणि तालुक्या मध्ये समाज बांधवांनी आंदोलन करावे किंवा निवेदन तरी द्यावे एक सोबत प्रभाव पडला पाहिजे म्हणून समाज बांधवांनी राज्य भर आंदोलन करावे असे आवाहन धनगर ऐक्य परिषदेने केले आहे..
%20(8).jpeg)