शिरपूर (१८ नोव्हेंबर) येथील आर.सी. पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालय आदर्श नगर,शिरपूर येथील "विद्यार्थी पदग्रहण समारंभ" श्री.राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल मेन बिल्डिंग येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन तसेच सरस्वती पूजन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्कूल कमिटी चेअरमन मा.श्री. योगेश भंडारी साहेब, संस्थेचे सी.ई.ओ. डॉ. उमेश शर्मा साहेब विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल परब, संस्थेचे जेष्ठ प्राचार्य श्री. पी. व्ही.पाटील सर, प्राचार्या मनीषा मॅडम, प्राचार्या, मधुबाला राही, प्राचार्या स्मिता पंचभाई, प्राचार्य सचिन पाटील तसेच विद्यालयाचे उपस्थित पालक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्कूलच्या विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी "आशाये"' या गीतावर स्वागत नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. विद्यार्थी पदग्रहण समारंभ गठीतीबाबत विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल परब यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी पदग्रहण सोहळ्या बाबत संदेश दिला की, विद्यार्थी समाजाचा घटक आहे. उद्याचा देशाचा जबाबदार नागरिक असणार आहे म्हणून विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत नेतृत्व गुण, स्वयंशिस्त विकसित करण्यासाठी विद्यार्थी पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हाऊस ची निर्मिती केली जाते. त्यात रेड हाऊस,ब्ल्यू हाऊस, ग्रीन हाऊस,येलो हाऊस, प्रत्येक हाऊसचा ध्वज विद्यार्थ्याला गतिशील करतो. शक्ती, तेज, कृती, शांती असे संदेश या ध्वजातून दिले जातात. सदर विद्यार्थी पदग्रहण समारंभात तसेच शालेय विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यात आली. इयत्ता ५ ते ७वी चे १६ विद्यार्थी प्रतिनिधी, इयत्ता ८ व ९ चे १६ विद्यार्थी प्रतिनिधी तसेच विद्यालयाचा सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, शिस्त विभाग, समन्वयक म्हणून ६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. , रेड हाऊस, ब्लू हाऊस, ग्रीन हाऊस, येलो हाऊस. हाऊस मास्टर, हाऊस मिस म्हणून १६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच स्कूल हेड बॉय मास्टर दिग्विजय विसाले विद्यालयाची हेड गर्ल मिस अदिती साळुंखे म्हणून निवड करण्यात आली.यांना बॅजेस, सॅंचे देऊन पदग्रहण स्कूल कमिटी चेअरमन मा. श्री. योगेशभाऊ भंडारी साहेब, संस्थेचे सी.ई.ओ डॉ. उमेश शर्मा, विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल परब संस्थेचे जेष्ठ प्राचार्य श्री.पी. व्ही. पाटील, प्राचार्य मनीषा मॅडम, प्राचार्या मधुबाला राही, प्राचार्या स्मिता पंचभाई, प्राचार्य सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण 56 विद्यार्थ्यांनी पदग्रहण केले. विद्यालयाचे सुमारे 600 विद्यार्थी पदग्रहण समारंभासाठी उपस्थित होते.विद्यार्थी पदग्रहण सोहळ्याची पद गोपनीयता सार्वजनिक शपथ घेण्यात आली. विद्यार्थी पदग्रहण समारंभासाठी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल परब यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक डी.बी.पाटील, अनुप चंडेल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक रवि सोनगिरे, सैफा अन्सारी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रवि धनगर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
आर.सी.पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पदग्रहण समारंभ संपन्न
byMahendra Rajput
-
0

