शिरपूर तालुक्यातील जनता सुखी, संपन्न व्हावी यासाठी भाई व आम्ही सर्वच प्रयत्न करत आहोत - भूपेशभाई पटेल आंबे येथील ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालय इमारतीचा थाटामाटात उद्घाटन समारंभ संपन्न



 

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील जनता सुखी, संपन्न व्हावी यासाठी भाई व आम्ही सर्वच प्रयत्न करत आहोत. तालुक्यात पाणी समस्या कुठेही यायला नको यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिरपूर पॅटर्न मार्फत आंबे, खंबाळे परिसरासह संपूर्ण तालुक्यात पाण्याचे मोठे काम आम्ही केले. अत्याधुनिक शिक्षणानेच जागतिक स्पर्धेत टिकता येणार असल्याने पालकांनी सर्व मुलामुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप, शाळेत अत्याधुनिक सोयी सुविधा, सेमी इंग्लिश शिक्षणाची सुविधा, रस्ते व्यवस्था यांसह आंबे व इतर गावांचा विकास सुरु आहे. गरजूंना मोफत रेशन वाटपची व्यवस्था, गरजूंना मोफत शिवणकाम, द्वेता गारमेंट्स मार्फत मुलींसाठी सोयीसुविधा होत असून टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावात हे कार्य सुरु करत आहोत. आंबे गावाला पूर्णपणे विकसित करण्यासाठी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कु. द्वेता पटेल हिचे कार्य कौतुकास्पद असून कापडी पिशव्या वाटप, एक मुठ्ठी अनाज अभियान राबविण्यात येत आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एस. व्ही. के. एम. नर्सिंग कॉलेजचे भूमिपूजन झाले असून लवकरच भाई आयुर्वेदिक, होमिओपॅथिक व इतर मेडिकल कॉलेज सुरु करत आहेत. मोतिबिंदू शस्त्रक्रिया व दिव्यांग बंधू भगिनींसाठी देखील आपण मनापासून सेवाव्रत घेतले आहे असे प्रतिपादन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांनी केले.


 

तालुक्यातील आंबे येथील ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालय इमारतीचा उद्घाटन समारंभ माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते सोमवारी 14 नोव्हेंबर 2022 दुपारी 12 वाजता मोठया थाटामाटात संपन्न झाला. यावेळी शिरपूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित पदाधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच, पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा देखील संपन्न झाला.

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल, श्रीमती अंजूबेन पटेल (लंडन), गटविकास अधिकारी एस. टी. सोनवणे, आंबे येथील वि. का. सोसायटीचे चेअरमन आर. आर. माळी, धुळे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कैलास पावरा, शिरपूर पंचायत समिती सभापती प्रतिनिधी वसंत मांगू पावरा, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, सुभाष कुलकर्णी, दिनेश पावरा सदस्य पं.स. आंबे गण, सौ. मिनाक्षी प्रितम पावरा (सरपंच ग्रा.पं. आंबे), गोकुळसिंग राजपूत, संजय चौधरी, जगन टेलर, धीरज माळी, सौ. रोझी धीरज देशमुख, विस्तार अधिकारी एस. एस. पवार, ग्रामसेवक व्ही. बी. भोई, अभियंता निलेश माळी, प्रभाकर पाटील ठेकेदार, उपसरपंच सोनबाई शिवाजी पावरा, सदस्य उषाबाई पावरा, रमाबाई पावरा, दिपाली पावरा, सपना मोरे, हिराबाई भिल, वत्सलाबाई माळी, भटूसिंग वंजारी, सिताराम पावरा, सुरेश पावरा, आकेश पावरा, चत्तरसिंग पावरा, मगन पावरा, प्रितम पावरा, ग्यारसीलाल रामलाल पावरा, गेंदराम  पावरा, सखाराम पावरा, कृष्णा पावरा, राजू पावरा, मोतीराम पावरा, सायसिंग पावरा, शिवलाल पावरा, चमक्या पावरा, ग्यारसिलाल पावरा, हिरालाल  पावरा, शालिक कोळी, बसंतीलाल देशमुख, शिवदास माळी, लोटन माळी, सखाराम माळी, युवराज माळी, शंकर माळी, शिकला पावरा, अस्तर पावरा, सजन पावरा, काशिनाथ पावरा, पवन पावरा, रियानसिंग पावरा, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पदाधिकारी व अनेक मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

ढोल ताशे व आदिवासी पारंपारिक वेशभूषेत महिला, पुरुष, युवक, युवती, खंबाळे येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्यावर ठेका धरत आदिवासी परंपरेनुसार उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने