पुणे: जेष्ठ साहित्यिक डॉ कोतापल्ले यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करीता दाखल करण्यात आले आहे.एक वर्षापूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते .तेव्हापासून पिंपरी- चिंचवडच्या राहत्या घरी सून आणि मुलगा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. परंतु, गेल्या १५ दिवसांपूर्वी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सून शिल्पा कोत्तापल्ले यांनी केले आहे.
.png)