जबरीचोरी करुन बॅग व रोख रक्कम पळवणारी परराज्यातील महिला आरोपीतांची टोळी जेरबंद, गुन्हयातील १२,५००/- रु. मुददेमाल हस्तगत, पिंपळनेर पोलीसांची कामगीरी




पिंपळनेर - जबरी चोरी करून बॅग व रोग रक्कम पळणारी महिलांची टोळी पकडण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले असून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल व आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी पथकांची नियुक्ती केली आहे 

पिंपळनेर परिसरात होणाऱ्या घर कोडी व इतर चोरीच्या प्रकाराबाबत सतर्क राहून कारवाई करणे बाबत वरिष्ठांनी सूचना केलेल्या होत्या.
 त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हददीत सदर गुन्हे उघडकीस आणणे करीता बाजार परिसर सराफा, बँक परिसरात विशेष पथक नेमण्यात आले होते.


पिंपळनेर पोलीस स्टेशनला यापूर्वी बसस्टॉप परिसरात एस टी बस मध्ये महिलानी गदीचा फायदा घेत सोनसाखळी चोरी केल्याची घटना घडली होती त्यांनुसार यापूर्वी गुरनं २८८ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९, इतर गुन्हे अभिलेखावर दाखल आहेत त्यानुसार मा वरिष्ठांकडील मिळालेल्या सुचना व मार्गदर्शन नुसार आम्ही पिंपळनेर गाव हे बाजारपेठ व व्यावसायीकांचे. सतत वर्दळीचे असल्याने सुचना नुसार ट्रॉफिक कर्मचारी तसेच टाऊन बिट अंमलदार कर्मचारी यांनी सक्तपणे पेट्रोलींग करुन गुन्हयांना आळा बसावा यासाठी सुचना दिले आहेत त्यानुसार पेट्रोलींग नेमण्यात आलेली होती.


दिनांक २९/११/२०२२ रोजी पिंपळनेर पोलीस ठाणे येथे तक्रारदार कल्पना रघुनाथ गायकवाड वय ५० व्यवसाय गृहिणी रा. चिंचपाडा पो. बोधगाव ता. साक्री यांनी दि. २९/११/२०२२ रोजी दुपारी १२.३० स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा येथे घरखचांसाठी बॅन्केतून पैसे काढते वेळी मागोमाग तिन महिला होत्या तक्रारदार यांनी पैसे घेवुन बाजारपेठेत खरेदी साठी गेल्या असता मागोमाग असलेल्या महिला यांनी पाळत ठेवून मागोमाग जावून तक्रारदार या खरेदी करुन चाहेर पडताच रोख रुपये १०,०००/- रु असलेली बॅग बळजबरीने हातातून हिसकावून पळ काढला आरडाओरड करताच पेट्रोलींग साठी असलेले पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ परिस्थिती पाहून मिळालेल्या वर्णनाचे महिलांचा शोध घेत शिताफिने ताब्यात घेतले पोलीस ठाणे येथे आणून महिला पोलीस अमलदार यांचे मार्फतीने दोन पंचाचे उपस्थितीत अंगझडती कार्यवाही केली असता तक्रारदार त्यांचे वर्णनाप्रमाणे चोरीस गेलेली हेन्डबॅग व त्यातील रोख १०,०००/- दहा हजार रुपये व २५०/ रु ची हॅन्डबॅग हस्तगत केलेली आहे. व तक्रारदार हजर असल्याने आम्ही सविस्तर विचारपुस करुन तक्रारीनुसार सी सी टी एन एस गुरनं ३१६ / २०२२ भादवि कलम ३९२,३४ नुसार दाखल कार्यवाही केलेली आहे सदर महिलांना विचारपुस केली असता त्यांनी त्याची नावे १) गुंज्या मंदिप सिसोदिया, वय ३३ रा. कडियासांसी तहसील पचोर जिल्हा, राजगड, राज्य मध्यप्रदेश २) सुगणा अजबसिंग सिसोदिया वय ३५ रा कडियासांसी तहसील पचोर जिल्हा राजगड, राज्य मध्यप्रदेश ३) भारती महादु सिसोदिया वय २८ रा कडीयासांसी तहसील पचोर जि राजगड, राज्य मध्यप्रदेश यांना अटकेची कार्यवाही केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोसई / बी एम मालचे करीत आहेत पुढील तपासात अशा प्रकारचे मालमत्ते संदर्भात अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारे बाजारपेठ / बसस्टॅण्ड / सराफा व गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी पाळत ठेवून चोरी करणारी परराज्यातील महिला टोळी व याच कालावधी पासुन सोनसाखळी व रोख रुपये चोरी करीत होत्या त्यानुसार नागरीकांना विशेष आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे आजुबाजुला कोणीही संशयीत महिला अगर पुरुष दिसून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन अगर डायल ११२ वर संपर्क करून सदर बाबत माहीती दयावी

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड सो मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे सौ मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदिप मेराळे सो यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक सचिन साळुंखे, पासई / बी एम मालचे मोना /  हिराबाई ठाकरे पोहेको / निलेश महाजन पोकों / सोमनाथ पाटील यांच्या पथकाने केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने