हर हर महादेव'च्या वादात राज ठाकरेंनी घेतली पुण्यातील इतिहास संशोधकांची भेट प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे: 'हर हर महादेव' या चित्रपटाचा वाद विकोपाला गेल्यानंतर यांनी यांची भेट घेण्यासाठी आज पुण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड यांच्या चित्रपटाला विरोध असून बऱ्याच चित्रपटगृहातील शो बंद पडले आहेत. दुसरीकडे मनसेने शो सुरू करण्यासाठी संरक्षण दिले आहे. राज्यात या चित्रपटावरून राजकारण पेटलेला असताना राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जाते. याबाबत इतिहास अभ्यासक मेहेंदळे यांना विचारला असता ते म्हणाले, राज ठाकरे आमची भेट घेण्यासाठी आजच नाही यापूर्वीही येत होते. बाबासाहेब पुरंदरे हयात असताना ते त्यांची भेट घेतल्यानंतर माझी भेट घेत असायचे. राज ठाकरे यांना इतिहासाचा आणि शिवाजी महाराजांच्या अभ्यासाबद्दल कुतुवल आहे, म्हणून ते सातत्याने त्यांचे प्रश्न आमच्याकडून जाणून घेत असायचे. आज देखील त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत दहा प्रश्न माझ्याकडून जाणून घेतले. अशी माहिती इतिहास अभयसक गजानन मेहंदळे यांनी माध्यम प्रतिनिधीशी फोन द्वारे चर्चा करताना दिले. 



 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या प्रिमियर शो साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दोन दिवसांनंतर छत्रपती संभाजी राजेंनी पत्रकार परिषदे घेऊन या चित्रपटाचा संताप व्यक्त केला.  "हर हर महादेव या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला इतिहास मोडतोड करून, चुकीचा इतिहास दाखवण्यात आला आहे", असा थेट आरोप संभाजी राजे यांनी केला होता. त्यासोबत आगामी चित्रपट 'वेडात मराठी वीर दौडले सात' या चित्रपटांवरती देखील आक्षेप नोंदवला होता. या भूमिकेनंतर राज्यात 'हर हर महादेव'चा शो बंद करण्याची भूमिका राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडने घेतली होती. त्याचा विरोध करत मनसेने पुन्हा एकदा शो सुरू केला. 
मात्र राजकारणात हे खटके उडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चित्रपटाविषयी भूमिका मांडण्यास स्पष्ट मनाई केली. योग्य वेळी मी आपलं मत मांडेन असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन इतिहास अभ्यासक गजानन मेहंदळे यांची भेट घेतली. म्हणून येणाऱ्या भविष्यात राज आपली भूमिका काय मांडतील हे पाहणं औचित त्याचा ठरणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने