बालाजी नगरी श्रीक्षेत्र शिरपूर जि.धुळे येथे वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र. ११ वा वर्धपानदिन मंगलमय सोहळा जल्लोषात संपन्न



  शके १९४४ कार्तिक वद्यपक्षे ३ वार शुक्रवार दि.११ नोव्हेंबर २०२२  हा शुभ - दिवस म्हणजे वारकरी, माळकरी व टाळकरी वैष्णव प्रेमीजनांसाठी एक महापर्वणीच ठरली. श्रीराम मंदिर देवस्थान (श्री भोंगे) प्रांगण येथे सकाळी ठिक १० वाजता ह्या मंगलमय सोहळ्यास वारकरी भजन संगीताचा आनंद घेऊन, वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक  *ह.भ.प. मेघश्याम महाराज-मठाधिपती श्रीराम बालाजी संस्थान श्रीक्षेत्र शिंदखेडा जि.धुळे* यांचे अध्यक्षतेखाली प्रारंभ करण्यात आला. ह.भ.प. मेघश्याम महाराज, बाल - ब्रह्मचारी गौ - सेवक, रामकृष्ण उपासक महंत सतिषदास महाराज भोंगे (सदस्य - अखिल भारतीय वारकरी कुंभमेळा परिषद.( संत एकनाथ महाराज अंतर्गत) मठाधिपती व विद्यमान गादीपती श्रीराम मंदिर देवस्थान बालाजी नगरी श्रीक्षेत्र शिरपुर) तालुक्याचे आध्यात्मिक विचारधारा असलेले *लोकप्रिय आमदार दादासाहेब काशीराम वेचान पावरा*, विकासाचा ध्यास घेतलेले वृक्षमित्र, *देवभक्त मा. श्री भुपेशभाई रसिकलाल पटेल* (मा.उपनगराध्यक्ष शिरपूर - वरवाडे नगरपरिषद तसेच विद्यमान चेअरमन प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणी शिरपूर), *मा. श्री रावसाहेब प्रभाकरराव तुकाराम चव्हाण* (मा. नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक शिरपुर - वरवाडे नगरपरिषद तसेच विद्यमान व्हाईस चेअरमन-प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी), *मा. श्री देवेंद्र पाटील* (उपाध्यक्ष जिल्हा परिषद धुळे), *बापुसाहेब मा. श्री छगन गुजर* (अध्यक्ष श्री विठ्ठल - रुक्मिणी संस्थान श्रीक्षेत्र निमझरी ता.शिरपूर), *प्रसिद्ध उद्योगपती मा. श्री नितीन राजपुत*, *नानासाहेब मा. श्री किशोर माळी* (ता. अध्यक्ष भा. ज.पा.), *नानासाहेब मा. श्री सतीश पाटील* (रा. दहीवेल ता. साक्री), वारकरी बांधवांवर नितांत प्रेम करणारे *नानासो. भालचंद्र दुसाने* (प्रसिध्द व्यापारी - पिंपळनेर ता. साक्री), *ह.भ.प. मा. श्री अधिकार पाटील सर* (निवृत्त अधिकारी A. C. B. रा.सायने ता.जि.धुळे), *मा. श्री राजेंद्र जगदिश अग्रवाल* (बाबुजी प्रतिष्ठान) शिरपुर, *बापूसाहेब ह.भ.प. संजय वामन चव्हाण* (ता. अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र), *नानासाहेब ह.भ.प. नानाभाऊ विश्वासराव पाटील* (रा. जुने भामपुर, शिरपूर तालुका कार्याध्यक्ष वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र), *ह.भ.प. दिलीप बापु पाटील* (रा. मांडळ ता. अध्यक्ष शिंदखेडा), *ह.भ.प. संतोष महारु माळी* (रा. वरवाडे - शिरपुर कार्याध्यक्ष शिरपुर ता.वारकरी सेवा मंडळ व शहराध्यक्ष भा. ज.पा. आध्यत्मिक समन्वय आघाडी शिरपुर), *बापुसो.अरुण धोबी* (जि. सरचिटणीस, भा. ज. पा.) *भाऊसो. संजय आसापुरे* (जि. सरचिटणीस भा.ज.पा. ओ. बी.सी. मोर्चा) यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन ह्या मंगलमय सोहळ्यास सुरुवात करण्यात आली.


सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात येऊन भागवताचार्य, गौ - सेवक, संत - साहित्य अभ्यासक, वेदांतचार्य *ह.भ.प. प्रमोद रघुनाथ भोंगे* (धुळे जिल्हाध्यक्ष- वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र) यांनी प्रास्ताविक करून परिषदेचे महत्व सविस्तरपणे विषद केले. मान्यवरांचे हस्ते ह.भ.प. प्रमोद महाराज भोंगे यांची धुळे जिल्हाध्यक्षपदी निवड झालेबाबत सन्मान करण्यात येऊन मान्यवरांचे हस्ते किर्तनकारांना *"विठ्ठल पुरस्कार”* देऊन गौरविण्यात आले. 

*रावसाहेब मा. श्री प्रभाकरराव चव्हाण* (विद्यमान नगरसेवक) तसेच *आमदार सो. दादासाहेब काशीराम वेचान पावरा* यांनी आपले जीवनात अध्यात्म किती महत्वाचे असते तसेच अध्यात्म व राजकारण यांची सांगड कशी असावी ह्याबाबत खुपच सुंदर विचार, अगदी सोप्या भाषेत उदाहरणासहित विषद केले. *ह.भ.प. मेघश्याम महाराज* मठाधिपती श्रीराम बालाजी संस्थान श्रीक्षेत्र शिंदखेडा यांनी आध्यत्मिक विचारधारेचे दाखले देऊन अध्यक्षीय भाषण विषद केले.                                                  *विठ्ठल पुरस्कारार्थी—* ह.भ.प.चंद्रकांत महाराज अर्थेकर,ह.भ.प.नाना महाराज नरडाणेकर,ह.भ.प.सुधाकर महाराज जैताणेकर,महंत अशोक चौधरी महाराज भाटपुरेकर,ह.भ.प.सौ.शोभाबाई माळी धुळेकर,ह.भ.प.जयेश महाराज वाघाडीकर 
या मंगलमय सोहळ्यास महिला वर्गाची उपस्थित लक्षणीय होती
धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावागावातून समस्त वारकरी हजर होते ह्या मंगलमय सोहळ्याचा प्रसाद म्हणून बाल ब्रह्मचारी गौ - सेवक महंत सतिषदास महाराज भोंगे यांचे हस्ते वारकऱ्यांना श्रीफळरुपी प्रसाद प्रदान करण्यात आला.सुत्रसंचालन श्री चेतन चौधरी सर यांनी व उपस्थित वारकऱ्यांचे आभार मानुन महाप्रसादाचा लाभ घेऊन *वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र - ११ वा "वर्धपानदिन”* ह्या मंगलमय सोहळ्याची सांगता करण्यात आली. श्रीरामभक्त मा. श्री चेतन चौधरी सर यांनी खुपच सुंदर सुत्रसंचलन केले. 

*"हा सुख - सोहळा स्वर्गी नाही”* ह्या उक्तीप्रमाणे हा मंगलमय सोहळा माऊली ज्ञानेश्वर महाराज (श्रीक्षेत्र आळंदी)  यांनी आपल्या सकल भक्तांकडुन सेवेच्या रूपाने करून घेतला. जय जय रामकृष्णहरी, जय जय गौ - माता,जय बालाजी

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने