शिवसेना-महाराष्ट्र वाहतूक सेनेचा अनोखा उपक्रम* - *मूकबधिर विद्यार्थ्यांना स्वेटर देऊन मा. श्री उदयजी दळवी साहेबांचा वाढदिवस साजरा





श्री मा. उदयजी दळवी साहेब शिवसेना-महाराष्ट्र वाहतूक सेना महाराष्ट्र अध्यक्ष तसेच सरचिटणीस श्री सूर्यकांत तांडेल यांच्या मार्गदर्शनात माननीय जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात आणि शिरपूर शहर अध्यक्ष  हेमंत पाठक यांच्या प्रयत्नाने साहेबांचा वाढदिवस महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी शिरपूर येथील मूकबधिर विद्यार्थ्यांना स्वेटर देऊन साजरा केला. यावेळेस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद म्हावत नव्हता.माननीय उदयजी दळवी साहेबांचा हा वाढदिवस विद्यार्थ्यांसाठी उबदार ठरला.



 वाढत्या थंडीचा प्रमाण या गोष्टीचा सामाजिक भान ठेवून महाराष्ट्र वाहतूक सेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी वाढदिवस आनंदात आणि उत्साहात साजरा केला. याप्रसंगी कार्यक्रमात उपजिल्हा संघटक  विभाभाई जोगराणा, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना जितेंद्र पाटील, उपजिल्हा युवाअधिकारी अनिकेत बोरसे, तालुकाध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना  संजय भाऊ जाधव, तालुकाध्यक्ष विजय चव्हाण , महाराष्ट्र वाहतूक सेना शहराध्यक्ष हेमंत पाठक , सचिव गणेश बिरारी, उपतालुका अधिकारी युवासेना जितेंद्र राठोड,उपशहर अध्यक्ष जावेद शेख, पिंटू शिंदे, एन डी पवार, अविनाश गुंजाळ, शोएब मणियार, कुरेश खाटीक, अरबाज शेख आधी शिवसैनिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने