होळनांथे येथे मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, शिरपूर एज्युकेशन सोसायटी, जि. प. धुळे व सागर मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वच्छ प्लास्टिक संकलन अभियान" मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

 




शिरपूर : मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, शिरपूर एज्युकेशन सोसायटी, जिल्हा परिषद धुळे व सागर मित्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होळनांथे येथे "स्वच्छ प्लास्टिक संकलन अभियान" मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील आर. सी. पटेल सीबीएसई इंग्लिश स्कूल मध्ये तसेच होळनांथे बिट मध्ये "स्वच्छ प्लास्टिक संकलन अभियान" शुभारंभ दीपप्रज्वलन करुन शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता अनेक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.



यावेळी व्यासपीठावर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल, श्रीमती अंजूबेन पटेल, धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अश्विनी पाटील, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भूषण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप पवार, शिरपूर गटविकास अधिकारी संजय सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. भैरवी प्रेमचंद शिरसाठ, प्रेमचंद शिरसाठ, सरपंच चंदू पाटील, सुभाष कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी एफ. के. गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे, बी. एस. बुवा, मनिषा वानखेडे, संजय चौधरी, भालेराव माळी, प्राचार्य विजय सुतार, प्राचार्या भूमिका गर्ग, सौ. पौर्णिमा पाठक, डॉ. सुप्रिया पंतवैद्य, पंचक्रोशीतील सरपंच, पदाधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक, ग्रामस्थ, जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप पवार म्हणाले, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पॅटर्न अंतर्गत पाण्याचे मोठे काम, वृक्ष लागवड यासारखे कार्य मोठ्या प्रमाणात खूप आधीपासून सुरू आहे. मुकेश पटेल चारिटेबल ट्रस्ट मार्फत सुरू करण्यात आलेले विविध उपक्रम हे फार मोठे आदर्शवत कार्य असून त्यांनी सुरू केलेले स्वच्छ प्लास्टिक संकलन ही बाब राष्ट्रीय कल्याणासाठी खूपच आवश्यक आहे. प्लास्टिक अति वापरामुळे जमिनीचा ऱ्हास, मानव व प्राणी यांना खूपच हानिकारक झाले असून शाळांमधून विद्यार्थ्यांमार्फत बालवयात प्लास्टिक बाबत सुरु केलेली अंमलबजावणी आदर्श कार्य आहे.

गटविकास अधिकारी संजय सोनवणे म्हणाले, शिरपूर तालुक्यात भाईंचे कार्य अफाट आहे. त्यांनी अनेक विकासकामांचा सर्वत्र आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील जनतेने स्वच्छतेबाबत शासनाच्या आदेशांचे पालन करावे. तालुक्यात आता बांबू लागवडीवर भर द्यायचा आहे.

सौ. पौर्णिमा पाठक यांनी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य व माहिती दिली. कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन आदिवासी दुर्गम भागात सॅनिटरी कापडी पैड, विविध कार्यक्रम यांची माहिती दिली. विद्यार्थी व सर्वानी कापडी पिशवी, कागदी पिशवी नेहमी सोबत ठेवावी असेही त्यांनी सांगितले. ट्रस्ट मार्फत 35 परस बाग तयार केल्या, भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त पप्पाजी नर्सरी तयार केली, गुड टच बॅड टच बाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या मानसिक सुदृढते साठी आर्ट बेस थेरपी, सागर मित्र पुणे यांच्या संकल्पनेतून स्वच्छ प्लास्टिक संकलन अभियान उपक्रम आता जिल्ह्यात राबविला जाणार आहे.



डॉ. सुप्रिया पंतवैद्य यांनी मोठ्या स्क्रीन वर चित्रफित दाखवून प्लास्टिक संकल्पना बाबत तसेच प्लास्टिकच्या अतिवापरामुळे देशभरात व जगभरात होणाऱ्या दुष्परिणामांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी फक्त स्वतःच्या घरातील स्वच्छ प्लास्टिक, रिकामे पेन, बाटली, प्लास्टिक पिशव्या गोळा करून एकत्रित रित्या शाळेत जमा करावे असे सांगून मुकेश पटेल ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
सूत्रसंचालन अनिल जाधव यांनी केले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. निता सोनवणे यांनी मानले. शेवटी जिल्हा परिषदेचे संतोष नेरकर यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छतेबाबत व प्लास्टिक बंदी बाबत शपथ दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने