प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी चेअरमनपदी भूपेशभाई पटेल, व्हाईस चेअरमनपदी प्रभाकरराव चव्हाण यांची बिनविरोध निवड

 



शिरपूर : येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी चेअरमनपदी भूपेशभाई रसिकलाल पटेल, व्हाईस चेअरमनपदी प्रभाकरराव तुकाराम चव्हाण यांची बिनविरोध निवड 12 नोव्हेंबर 2022 रोजी झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी मर्यादित शिरपूर या संस्थेची 2022 ते 2027 या कालावधीसाठी सर्व 17 जागांसाठी  1 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक बिनविरोध झाली होती.



निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी सूतगिरणीच्या कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पाडली. चेअरमन पदासाठी भूपेशभाई रसिकलाल पटेल यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. सूचक जनार्दन तानाजी पाटील व अनुमोदक सौ. रंजना रवींद्र गुजर होते. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी प्रभाकरराव तुकाराम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सूचक जगतसिंग आनंदसिंग राजपूत व अनुमोदक सुदाम नथू भलकार होते. निवडणूक प्रक्रियेसाठी अमोल एंडाईत, रविंद्र चौधरी यांनी सहकार्य केले.



नवनिर्वाचित चेअरमन भूपेशभाई रसिकलाल पटेल (शिरपूर), व्हाईस चेअरमन प्रभाकरराव तुकाराम चव्हाण (शिरपूर) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित संचालक गोपाल किसनलाल भंडारी (शिरपूर), जनार्दन तानाजी पाटील (भाटपुरा), संग्रामसिंग सरदारसिंग राजपूत (अहिल्यापूर), नामदेव श्रावण चौधरी गुजर (वाडी बु.), रमेश बन्सीलाल कोळी (होळनांथे), जगतसिंग आनंदसिंग राजपूत (जातोडा), भरत भिवसन पाटील (बलकुवा), आशिष जयराम चौधरी (शिरपूर), संदीप शालिक देवरे (वरवाडे), अजितकुमार जीवनलाल शाह (शिरपूर), वासुदेव देवराम पटले (पाटील) (मांजरोद), सत्तारसिंग दुर्गा पावरा (रा. हिंगोणीपाडा पो. लौकी ता. शिरपूर), सौ. रंजना रवींद्र गुजर (खर्दे बु. पो. उंटावद), सौ. मेघा राजेंद्र पाटील (शिरपूर), सुदाम नत्थू भलकार (तऱ्हाडी त. त.) उपस्थित होते.



सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, शिरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन कैलासचंद्र अग्रवाल, कार्यकारी संचालक एफ. डी. पाटील, सल्लागार पंकज जाजू, एस. के. महाजन, शरद मिस्त्री, आनंद पाटील, किशोर कुलकर्णी, ए. जी. पवार, संतोष जाधव, महेंद्र पटेल, भैया चव्हाण, मनोज पाटील, सूतगिरणीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासद व अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने