क्रीडा स्पर्धा‎: एस.पी.डी एम महाविद्यालयात‎ मैदानी क्रीडा स्पर्धेचे रंगतदार आयोजन



कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व‎ धुळे विभाग क्रीडा समिती‎ धुळे अंतर्गत, किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एस पी डी एम, कला,‎ शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाने,‎ धुळे येथे, दि.11 व 12 नोव्हेंबरला‎ आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा‎ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले‎.‎ या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून‎ सोनगीर महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.के.बी पाटील, अभय युवा कल्याण केंद्र संचलित कला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम बाविस्कर,धुळे विभाग क्रीडा समितीचे अध्यक्ष आणि प्राचार्य,प्रोफेसर डॉ. एस.एस राजपूत, उप प्राचार्य डॉ. एफ एम बागुल,डॉ.एस पी महीरे, धुळे विभाग क्रीडा समितीचे सचिव प्रा.डॉ.एल के प्रताळे तसेच धुळे जिल्हा क्रीडाधिकारी हे उपस्थित‎ होते.
या स्पर्ध मध्ये एकूण 35 महाविद्यालयातील 217 महिला आणि पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला.अतिशय रंगतदार अश्या स्पर्धा पाहायला मिळाल्या.स्पर्धेतील सर्वात वेगवान धावपटू होण्याचा मान एसपीडी महाविद्यालयाचा खेळाडू कुमार प्रशांत श्याम पाटील याला गेला.स्पर्धेतील विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेतील विजयी खेळाडू हे दिनांक 21 व 22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आंतर विभागीय स्पर्धेसाठी मु.जे. महाविद्यालय जळगाव येथे जाणार आहे. 
स्पर्धा यशस्वी करण्याकामी वरिष्ठ क्रीडा संचालक प्रा बी.बी बारसे, डॉ व्ही.एल पाटील, डॉ. नरेश बागल, डॉ. के.जी बोरसे, प्रा. नरेंद्र पाटील, डॉ नितीन पाटील,प्रा.महेंद्र नगराळे, डॉ. नितीन वाळके, डॉ. विनय पवार डॉ.तेजस शर्मा, प्रा.राहुल पाटील प्रा.हर्षदा पाटील, प्रा.अमोल अहिरे, प्रा.योगेश ठाकूर,प्रा.सुधाकर पाटील, प्रा.पूजा जैन प्रा. विजय शिंदे,प्रा. राधेश्याम पाटील तसेच धुळे जिल्हा अथलेटिक्स संघटनेचे श्री प्रमोद पाटील आणि त्याचे सहकारी आदींनी परिश्रम घेतले.
यशस्वी स्पर्धा आयोजन केल्याबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भाऊसो डॉ.तुषारजी रंधे, सचिव नानासाहेब निशांतजी रंधे, खजिनदार आशाताई रंधे विश्वस्त बाबसो रोहितजी रंधे आदींनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने