विविध धर्मांना मानणारे लोक भारत देशात राहतात आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्माबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक आहे. धार्मिक संस्था नेहमी हे काम करत आहेत आणि या कार्याला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक जागरूकता आणि इस्लामिक पद्धतीने जगुण घेण्याची इच्छा वाढवण्यासाठी, सुरमाज फाउंडेशन ने गुरुवार 3 नोव्हेंबर 2022 रोजी इस्लामिक कोईस स्पर्धा आयोजित केली ज्यामध्ये धर्म आणि इस्लामबद्दल अनेक मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सुमारे 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ज्यांना त्यांच्या श्रेणीनुसार तीन गटात विभागण्यात आले आणि प्रत्येक गटात सूरमाज फाऊंडेशनचे प्रथम पारितोषिक रोख 501 रुपये आणि द्वितीय पारितोषिक रोख 301 रुपये आणि तृतीय पारितोषिक रोख रक्कम 101 रुपये ठेवण्यात आली होती. सर्व मुलांनी या प्रश्नाला छान उत्तर दिले आणि चर्चेत भाग घेतला.
गट १ चे विजेते ताजउल खान इकबाल खान (नेशनल प्राइमरी उर्दू स्कूल चोपड़ा) यांना प्रथम, शेख अब्दुलमुतललीब (चावरा इंटरनेशनल स्कूल अकुलखेड़ा) यांना द्वितीय व मायरा शेख (बॉम्बे कैंब्रिज इंटरनेशनल स्कूल मुंबई) याला तृतीय बक्षीस मौलाना सैयद नदीम साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
गट २ च्या विजेत्या मिकाइल शेख (बॉम्बे कैंब्रिज इंटरनेशनल स्कूल मुंबई) यांना प्रथम, शेख हमजा (चावरा इंटरनेशनल स्कूल अकुलखेड़ा) यांना द्वितीय व व्हाईल शेख (चावरा इंटरनेशनल स्कूल अकुलखेड़ा) याला तृतीय बक्षीस, हाजी हारून खान साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
गट 3 च्या विजेत्या आवेश खान इकबाल खान (अल्फाज उर्दू हाई स्कूल जलगांव) यांना प्रथम, सराह शेख (अली अलाना इंग्लिश मीडियम स्कूल अक्कलकुवा) यांना द्वितीय व आयशा बानो आरिफ खान (प्रताप विद्या मंदिर चोपड़ा) याला तृतीय बक्षीस हाजी उस्मान शेख यांच्या हस्ते देण्यात आले
यासह सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पन्नास पन्नास रुपये कोहिनूर कंस्ट्रक्शन चे ठेकेदार आरिफ खान अजीज खान साहेब यांच्या तर्फे देण्यात आले.
हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सुरमाज फाऊंडेशन, चोपड़ा) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यासाठी मौलाना शादाब बागवान साहेब व हाफिज नदीम मौलाना साहेब उपस्थित होते, कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी डॉ.एम.डी. रागीब यांनी परिश्रम घेतले, विद्यार्थ्यांना आमंत्रित करणे व प्रेरित करण्यासाठी डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांच्या सहकार्य लाभले, तसेच शेख शमीम (उपाध्यक्ष सुरमाझ फाऊंडेशन), अबुलैस शेख, मुजाहिद इस्लाम, शोएब शेख, अब्दुल कादिर, शाहिद भाई व सूरमाज फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
Tags
news
