बिरसा फायटर्स कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडले* बिरसा फायटर्सचे घंटानाद आंदोलन व विजयकुमार गावित यांचा सत्कार समारंभात कार्यकर्त्यांत बाचाबाची



धडगांव: दिनांक 7 नोव्हेंबर रोजी   बिरसा फायटर्स धडगांवचे रस्त्यावरील खड्डे बुजवा व रस्ता तात्काळ दुरूस्त करा ,या मागणीसाठी दमदार घंटानाद आंदोलन झाले.याच दिवशी नंदुरबारचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचा धडगांव तालुक्यात दौरा होता,भाजपा पक्षातर्फे नागरी सत्कार समारंभ धडगांव येथे आयोजित करण्यात आला होता.परंतु मंत्री विजयकुमार गावित यांना धडगांव शहरात येण्या अगोदरच बिरसा फायटर्सचा रस्त्यासाठी दमदार असा घंटानाद आंदोलन व मोर्चा धडगांव शहरातून धणाणला.जुने धडगांव येथे विजयकुमार गावीत यांचा  सत्कार समारंभासाठी उभे असलेले भाजपा कार्यकर्ते व बिरसा फायटर्स धडगांवचे घंटानाद आंदोलनातील कार्यकर्ते रस्त्यावरच आमनेसामने भिडले. कालीबेल, सीसा,चूलवड, जरली,राडीकलम, पालखा हून बिरसा फायटर्सचा घंटानाद आंदोलन जुने धडगांंव येथे पोहचला,तेव्हाच विजयकुमार गावित यांची आतुरतेने वाट बघणा-या भाजपा कार्यकर्त्यांना आधी मोर्चाचे दर्शन घडले. आंदोलनाची परवानगी घेतली आहे का? असे एका भाजपा कार्यकर्त्यांनी प्रश्न केला ,त्यावर ऐवढे पोलीस बंदोबस्त साठी तुम्हाला दिसत नाही का? असे प्रदिप पावरा महासचिव धडगांव यांनी ठणकावले.दरम्यान रस्त्यावर वातावरण तापले,परंतु पोलिसांनी मध्यस्थी केली. बिरसा फायटर्सच्या घंटानाद आंदोलनाच्या बंदोबस्त साठी दंगल पथक पोलिसांची मोठी गाडी भरून पोलीस व धडगांव तालुक्यातील पोलीस आले होते.त्यामुळे मोर्चात पोलीस अधिक होते व  विजयकुमार गावित यांच्या सत्कार समारंभाच्या  बंदोबस्त साठी कमी पोलीस दिसले.त्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या,धडगांव शहरात लोक हे सगळे टक लावून बघत होते.
                     आक्रमक व जोशपूर्ण बिरसा फायटर्स धडगांव शाखा व गाव शाखा  चुलवड, पिंपळबारी,गौ-या ,धनाजे शाखेतील पदाधिकारी व सदस्य यांनी कालीबेल, सिसा,चूलवड, जरली,राडीकलम, पालखा गावाच्या खड्ड्यांसमोर  व शेवटी आठवडा बाजार धडगांव गाजवला.
          रस्त्यावरील खड्डे बुजवा,नाहीतर खुर्च्या खाली करा,पैसों से भिक जाओगे, ऐसे ही रोड पाओगे ,पोशा लेत मतदान कोहोते, ऐहलाच रस्ता सापडेहे,पौहा लिहून मतदान करहोत ते ,अहलाज रस्ता जुळहोत,स्थानिक पुढा-यांचा निषेध असो,धडगांव आमदारांचा निषेध असो,पालकमंत्र्यांचा निषेध असो,आदिवासी विकास मंत्र्याचा निषेध असो,अधिका-यांचा निषेध असो,धडगांव तालुक्यातील खड्डे बुजवा,जिकडे तिकडे खड्डेच खड्डे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
        आंदोलनात सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदिप पावरा तालुका महासचिव, कुवरसिंग पराडके कार्याध्यक्ष, सायसिंग पावरा गांव चूलवड अध्यक्ष व गांव टिम,अजय वळवी पिंपळबारी गाव अध्यक्ष व गांव टिम व गांवातील अनेक ग्रामस्थ सहभागी झाले.
      बिरसा फायटर्सचे घंटानाद  आंदोलन यशस्वी झाले, कारण उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धडगांव यांनी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष यांना लेखी पत्र दिले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने