नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार तालुक्यातील खोक्राले, निहाली, घोटाने, आसाने, कार्ली, बलदाने, भादवळ, सैताने, रनाले, वडबारे, सातूर्खे, वावद, चौपाले, ढणडाणे, निंभेल -कंड्रे, इत्यादी गावात दुष्काळ जाहीर करून शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे.
खोक्राळे* ता. जि. नंदुरबार या गावातील शिवारात कमी पाऊस झाला असून, परिसर मोठ्या प्रमाणात *दुष्काळ* ग्रस्त झालेले आहे. पिकांची वाढ झाली नाही व पिके वाळून गेली आहेत व विहिरींना पाणी नाही, गुरे ढोरांना चारा-पाणी नाही, आत्ता या महिन्यात अशी परिस्थिती आहे, म्हणून *खोक्राऴे* व परिसरतील गावांमध्ये दुष्काऴ जाहीर करुन शेतक-यांना लवकरात लवकर मदत मिऴावी अशी मागणी करण्यात आली आहे.
गावातील शेतकरीनी मोठ्या प्रमाणात पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत विमा घेतला आहे तरी त्याचा लाभ शेतकरीना मिळावा यासाठी *तहसील अधिकारी नंदूरबार,२.*जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.सुप्रियाताई गावित*३.*नायब जिल्हा-अधिकारी नंदूरबार*४.*जिल्हा कृषी अधीक्षक नंदूरबार*५.*पंतप्रधान पीक विमा प्रतिनिधी नंदूरबार*६ *कृषी- पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद नंदूरबार सौ.शितोळे ताई* प्रशासनातील या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून तालुक्यातील या गावांमध्ये कोरडा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने गांभीर्याने मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे
