पुणे : इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील पारेकरवस्ती येथे कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमा पर्यंत हनुमान मंदीरात काकडा भजन पारंपरिक पद्धतीने सुरू करण्यात आले होते.यामध्ये अबालवृद्धाने तरूण व महिलांनी काकडा भजनामध्ये सहभागी होवुन गावपणाची आठवण करून दिली.
पारेकरवस्ती येथे आजच्या 21 व्या शतकात विज्ञान युगात धार्मिक परंपरेचे महत्व टिकून आहे त्यामुळेच गाव खेड्यातील काकडा भजनाची परंपरा निरंतर टिकून राहिल. टाळ मृदंग चिपळ्या शंख घंटा नाद या स्वरांनी वनगळी पंचक्रोशीतील नागरिकांची पाहटरंभ भक्तीमय व उल्हासित वातावरणाने होत होती.
गावातील नागरिकांना काकड आरतीचा मान दिला गेला..
