भाटपुरा ग्रामपंचायतीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेप्रती हलगर्जीपणा च्या विरोधात निषेध आंदोलन

 



भाटपुरा गावात अनेक दिवसांपासून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  प्रतिमेला संरक्षण मिळावं,या साठी तार कंपाऊंड बांधाव, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा फार जुनी झाली असून शिवाजी महाराज यांची छत्री कधीही पडु शकते. याची माहिती ग्रामपंचायत भाटपुरा यांना गावातील तरुण मंडळींनी दिली. ग्रामसभेत ग्रामस्थांनसमोर आपल्या हे काम आम्ही करुन देऊन सांगितल्या नंतर तब्बल एक महिना उलटला तरी ग्रामपंचायत या विषयावर शांत बसून आहे. गावातील अगणित मुखे जनावरे येथे राहुन असता , चौफेर घानीचे साम्राज्य पसरले आहे. अशा वेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेप्रती विडंबना होते. अशा वेळी गावातील तरुणांनी आज जाहीर निषेध नोंदवले.झोपेचं सोंग करणार्या ग्रामपंचायतीला जागृत करण्याचे काम करण्यात आले. विविध घोषणा देऊन ग्रामपंचायत भाटपुराचे निषेध नोंदवले.पधरा दिवसाच्या आत हे काम अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.या वेळी गावातील तरुण सुशील देवरे, जितेंद्र राठोड, विशाल देवरे, अमोल देवरे, अजय देवरे,प्रविण देशमुख सागर देवरे, रमेश कोळी ,ईश्वर राठोड,डिंगबर राठोड उमेश राठोड, वाकडे, रोहित देवरे,सोनु भाऊ, कान्हा गोसावी आदि तरुण मंडळी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने