शहादा - दि. ०३/११/२०२२ रोजी दुपारी ०२/३० वा. चे सुमारास म्हसावद पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक, निवृत्ती पवार यांना गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, एक बोलेरो पिकअप वाहन क्र. क्र.MH-14-CP-4092 या वाहनात अवैधरित्या विदेशी दारु भरुन शहादा, वडगांव जावदा तह मार्ग भामराटा नाका कडे जाणार वाहतुक करणार असल्याचे गोपनीय माहीती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक पवार सो. पोना/ ३८१ घनश्याम सूर्यवंशी, पोना/१०३८ अजित गावित पोकां/२२३ प्रल्हाद राठोड, पोकां/३३० राकेश पावरा, पोकों/५०६ उमेश पावरा व दोन पंचासह जावदा ते धामराटा नाकाकडे, जाणा-या रोडवर जावादा गावाचे गांवठाण जवळ दबा धरुन बसुन मिळालेल्या बातमीनुसार जावद तह गावाकडुन भामटा नाकाकडे जाणारी एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप वाहनाला अडवुन सदर वाहनाची दोन पंचा समक्ष तपासणी केली असता सदर वाहनात ५,२८,०००/-रु. किमतीचे खाकी रंगाचे पुठ्याचे एकुण २०० बक्स, SOM POWER 1000 SUPER STRONG BEER स्टोन, असे मिळून आल्याने सदर माला बाबत वाहनाचे चालक कोमलसिंग तारसिंग भिल वय ४५ वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. पळासनेर ता. शिरपुर जि.धुळे यास सदर माला बाबत विचारपुस केली असता काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही तसेच सदर मालाचा परवाना व माल वाहतुकीचा परवाना सादर केला नाही. सबब त्याचेवर अवैधपणे दारु वाहतुक करीत असले बाबत खात्री झाल्याने सदर मालाचा दोन पंचासमक्ष पंचनामा करण्यात येवून सदरचे वाहन पोलीस स्टेशनला आणुन म्हसावद पोलीस ठाण्यात गुरन २७१/ २०२२ महा.दा.का. कलम ६५ (३) १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एकुण १०.२८,०००/- रु रुपये दारु व वाहनासह जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढिल तपास पोना/ १०३८ अजित गावित करीत आहे.
वरील कारवाई मा. पोलीस अधिक्षक, श्री पी. आर. पाटील सो. मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री श्रीकांत घुमरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
Tags
news
