खान्देश एक्स्प्रेस दररोज करा -दोडांईचा प्रवासी संघटनेची डि आर एम यांच्याकडे मागणी* दोडाईचा अख्तर शाह



दोंडाईचा पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक वर्मा साहेब व सर्व वरीष्ठ अधिकारी पश्चिम रेल्वे मुंबई यांचे दोंडाईचा रेल्वे स्थानकांवर कार्यालयीन परिक्षण दौ-यासाठी दोंडाईचा रेल्वे स्थानकांवर आगमन आज दिनांक ३ नोव्हेंबर गुरूवार रोजी झाले याप्रसंगी पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन  यांनी दोंडाईचा रेल्वे स्थांनकावरील समस्यांबाबत निवेदन करतांना सांगितले की भुसावळ - बांद्रा खान्देश एक्स्प्रेस प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे दररोज करण्यात यावी तसेच सदर गाडी भुसावळहुन सायं ६ ऐवजी रात्री ८ वा.व बांद्राहुन रात्री १२.२० ऐवजी रात्री १० वा.सोडण्यात यावी जेणेकरून सर्व प्रवाशांची वेळेची बचत होऊन सोय होईल तसेच सदर गाडीला वापी येथे थांबा देण्यात यावा कारण खान्देशातील तरुण मोठ्या संख्येने वापी औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत .उधना-पाळधी मेमु जळगांव पावेतो करण्यात यावी .सुरत-अमरावती सुपर फास्ट एक्स्प्रेस दररोज करण्यात येऊन तीची भाडे आकारणी जलद गाडीची असुन देखील तीची गती सामान्य गाडी सारखी आहे तरी सदर गाडीची वेळ मर्यादा कमी करुन गती वाढवीण्यात यावी . खान्देशातील प्रवाशांसाठी मुंबईप्रमाणे पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात शिक्षण उद्योग व्यवसायात खुप मोठी संख्या असुन पुण्यासाठी सुद्धा एक नविन गाडी सुरु करण्यात यावी .रोज रात्री १२ सुरत जाण्यासाठी दोन पँसेन्जर व एक मेमु अशा तीन प्रवासी गाड्या एकामागोमाग असुन त्याऐवजी पुर्वीप्रमाणे एक प्रवासी गाडी पहाटे करण्यात यावी तसेच सकाळी ८.३९ वा. भुसावळ हुन सुटणारी पँसेन्जर नंदुरबार ऐवजी थेट सुरतपावेतो करण्यात यावी . दोंडाईचा रेल्वे स्थानकांवर पुरेसे शौचालय , प्रवाशांना बसण्यासाठी शेड ,बाके ,गाडीची पोजीशन समजण्यासाठी बोगी इंडीकेटर बसवीण्यात यावे. इ मागण्यांचे निवेदन दोंडाईचा प्रवाशी संघटना व भाजप दोंडाईचा पदाधिकाऱ्यांनी दिले याप्रसंगी उपस्थित दोंडाईचा प्रवाशी संघटनेचे खुर्शिद कादीयानी भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन माजी नगरसेवक विजय मराठे कृष्णा नगराळे जितेंद्र गिरासे सर मनोज निकम संजय अग्रवाल शशीकांत शिंदे  रोटरीचे माजी अध्यक्ष चेतन सिसोदिया भरत जयपाल विक्की बाटुंगे रुपसिंग सिसोदे महेंद्र महाजन ईस्माइल पिंजारी कपुर जैन सुफियान तडवी इ पदाधिकारी उपस्थित होते .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने