भिमाई आश्रमशाळेत संविधान दिन उत्साहात साजरा प्रतिनिधी दत्ता पारेकर





पुणे -: इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, ,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधान उद्देशिका,घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमांचे पूजन प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करून करण्यात आले.
यावेळी संविधान उद्देशिकेचे प्रकट वाचन श्री.हिरालाल चंदनशिवे यांनी केले.
यावेळी कु.अक्षरा सवाणे (५ वी.), कु.निशा भोसले कु. अंजली गव्हाणे (७ वी), समाधान गिरी, कु. प्रतीक्षा घोडके (९ वी), कु.माया शेंडगे , सोनाली जाधव (१० वी), अनिल मंजुळे (१२ वी) आदी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
यावेळी सेवानिवृत्त जि.प.शिक्षक श्री.शिवलाल चितारे (व्याहळी) यांचे संविधानातील मूलभूत हक्क, ,अधिकार व कर्तव्य याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन लाभले.
यावेळी  शिवलाल चितारे गुरुजी यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांनी उपस्थितांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
कार्यक्रमास सर्व विद्यार्थी,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने