अक्कलकुवा गृप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या उषाबाई बोरा यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश




अक्कलकुवा गृप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या उषाबाई बोरा यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
        अक्कलकुवा येथे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात   शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत उषाबाई बोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी उषाबाई बोरा व त्यांचे चिरंजीव भटू बोरा यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला  याप्रसंगी माजी तालुका जयप्रकाश परदेशी,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख रविंद्र गुरव, जेष्ठ शिवसैनिक छोटु हाश्मी ,भिकमचंद चव्हाण,शहर प्रमुख रावेंद्र चंदेल,उप प्रमुख जितेंद्र लोहार ,तालुका उपप्रमुख किशोर परदेशी, युवा सेना शहर प्रमुख कुलदीप टाक, शेरमोहम्मद मकरानी दीपक मराठे आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने