शिरपूर - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत सोबत काढलेले फोटो इन्स्टाग्रामचे अकाउंट ओपन करून बदनामी करण्याच्या उद्देशाने फोटो व्हायरल केल्याची घटना शिरपूर तालुक्यात घडली असून पीडितेच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने विधिसंघर्ष बालकविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित विधिसंघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.सदर घटना ही शिरपूर शहरालागत असलेल्या एका गावात घडली असून एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार सदर विधिसंघर्ष बालकाने गावातील एका अल्पवयीन मुलीचा 2018 पासून 29 नोव्हेंबर 2022 पर्यंत पाठलाग केला.त्याने सोबत फोटो काढले. अल्पवयीन मुलीचे इंस्टाग्रामवर अकाउंट काढले आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने पीडितेचे फोटो व्हायरल केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.सदर तक्रारीवरून पोलिसात विविध कलमासह पोस्कोअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील तपास पीएसआय संदीप मुरकुटे करीत आहे
%20(10).jpeg)