शिरपुर तालुक्यातील होळनांथे येथे 29 नोव्हेंबर रोजी सकाळी धाडशी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली असून अज्ञातांनी कपाटातून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महेंद्र राजपुत वय ५४ वर्षे व्यवसाय शेती रा.होळनांथे यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर रात्री साडे बारा वाजेच्या कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे मुख्य दरवाजाचे कडीकोंडा व कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन घरातील गोदरेजच्या लोंखडी कपाटाचे दरवाजाचे खालील भागात असलेला लॉक तोडुन व दरवाजा वाकवून कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले रोख ३० हजार, २५ हजार रुपये किमतीची सोन्याची नथ व सोन्याचे तुकडे असे एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची तक्रार थाळनेर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय ठाकुर करीत आहे.
%20(23).jpeg)