शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चांदपुरी गावात चोरट्याने एका राहत्या घरात डल्ला मारला असून दरवाजाच्या कडी तोंडा तोडून व गोदरेज कपाटाच्या कोयंडा तोडून तीन लाख दहा हजार रुपयांची रोख रकमेची चोरी झाल्याची घटना आहे.
याबाबत तालुक्यातील चांदपुरी येथील फिर्यादी संजय मगन पटेल व 51 व्यवसाय शेती यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले आहे.
केल्याप्रमाणे फिर्यादी यांचे चार रूमचे घर असून सप्टेंबर 2022 मध्ये जुनी चार चाकी गाडी विकून आलेली रक्कम 45 हजार रुपये तसेच शेतीमालाची विक्री करून आलेली रक्कम असे एकूण तीन लाख दहा हजार रुपयांची रोख रक्कम घरातील गोदरेज कपाटात ड्रॉवरमध्ये लॉक करून ठेवण्यात आली होती. मात्र दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी उठल्यानंतर घरातील मागच्या रूमच्या दरवाजा उघडा दिसला व दरवाज्याची तुटलेला दिसला रूम मधील प्रोजेक्ट कपाट उघडे दिसले होते ते लॉकर देखील उघडे होते. त्यात ठेवलेले तीन लाख दहा हजार रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून झाल्याचे प्रकार दिसून आला. त्यामुळे त्यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत खबर प्राप्त झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यातून तात्काळ
घटनास्थळी शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, पीएसआय किरण बा-हे,पोहेकॉ किरण बागुल,पोना उमाकांत वाघ आदींनी भेट दिली तसेच श्वान पथक,फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. व पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
.jpeg)