शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा जामीनी अर्ज मंजुर झाल्या नंतर दोंडाईचा शहरात फटाके फोडुन जल्लोष.* दोडाईचा (अख्तर शाह)



 १०२ दिवसांपासुन तुरुंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयात मंजुर करण्यात आला,त्यामुळे महाराष्ट्र भर शिवसैनिकांन मध्ये मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे दोंडाईचा शहर शिवसेना व युवासेना यांच्या वतीने दोंडाईचा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्या जवळ फटाके फोडत जल्लोष केला, यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कोळी,उपजिल्हासंघटक कल्याण बागल,शिवसेनेचे विभागीय तालुका प्रमुख ईश्वर पाटील, उपतालुकप्रमुख शैलेश सोनार,शहर संघटक,राजेश रूपंचांदनी,उपशहरयुवाधिकारी योगेश बोरसे,किरण सावळे,संदीप भोई,लखन मराठे,राज ढोले,निलेश कोळी,निलेश विसावे,देवेंद्र अहिरे,सतिष कोळी राहुल कोळी,अंकित कोळी,गोलु पाटील,इरफान सैय्यद, कुणाल सोनार,विक्रम अहिरे,कैलास मालचे,संदीप तिरमली,सिकंदर पिंजारी,दीपक मराठे योगेश वाघ,गणेश कोळी व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने