अखेर शिवसेनेचा वाघ पिंजरा बाहेर, खासदार संजय राऊत यांची जामीनावर सुटका कोणतेही कारण नसताना ईडीने राऊत यांना अटक का केली?- न्यायालयाचे ताशेरे




मुंबई प्रतिनिधी - शिवसेना नेते व खासदार संजय राऊत तसेच त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे स्वतःच्या मर्जीने आरोपी निवडले मात्र मुख्य आरोपींना अटक केली नाही असे गंभीर ताशेरे पी एम एल ए कोर्टाने ओढले असून संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज झालेल्या सुनावणी वेळी इ डी ला चपराक देत राऊत त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात या अटकेबाबत नवे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जवळपास मागील 102 दिवसांपासून पत्राचार घोटाळ्याप्रकरणी ई डी ने संजय राऊत यांना अटक केली होती. त्यावर वारंवार जामिनासाठी प्रयत्न सुरू असताना राऊत यांच्या जामीन जामीनाला ई डी सतत विरोध करत होती. मात्र आज तब्बल 102 दिवसानंतर राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. तरी देखील ई डी ने या जामीनाला विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या दरवाजा ठोठावला मात्र तेथे देखील त्यांना निराशा पतकरावी लागली. जमिनीवर स्थगिती देण्यासाठी देखील कोर्टाने नकार दिला.
यावेळी कोर्टाने ई डी स्पष्ट सुनावले की गुणवत्तेच्या आधारावर युक्तिवाद करावा, आरोपींना अटक कायदेशीर होती का? हे पटवून द्यावे ,संजय राऊत यांना कोणतेही कारण नसताना अटक केली केली का? याबाबत शंका उपस्थित करत ई डी वर ताशेरे ओढण्यात आले.

यात या प्रमुख प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश वादवान व सारंग वादवान यांना अटक केली नाही म्हाडाची भूमिका संसयास्पद आहे त्यात कोणत्याही अधिकाऱ्यावर अटक नाही अन्य कोणात कोणत्याही आरोपीवर कारवाई नाही मात्र आपल्या मर्जीनुसार आरोपी ठरवून इ डी ने ही कारवाई केली आणि या सर्व कायदेशीर कारणास्तव हायकोर्टाने स्थगितीस नकार दिला.

त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पार करून संजय राऊत हे जेलच्या बाहेर आले असून शिवसेना कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राज्यभरातील शिवसेना समर्थक आज दीपावली साजरी करत असून विविध ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जात आहे. जेल पासून दुचाकीची फेरी निघणार असून राऊत हे सिद्धिविनायक मंदिर व मातोश्रीवर देखील जाणार असल्याबाबत माहिती समोर येत आहे. तब्येत बरी नसल्याने त्यांनी आज माध्यमांशी बोलण्याचे टाळले असून लवकरच माध्यमांशी सविस्तर बोलेल असे म्हटले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने