शिवसेनेची बुलंद तोफ पुन्हा एकदा भेटली शिवसैनिकांमध्ये आनंद भेटले* *सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं....!!!*




बभळाज येथे माननीय खासदार संजय राऊत साहेब यांच्या इडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर तब्बल 100 दिवस तुरुंगात राहून आज जामीन अर्ज मंजूर करून कोर्टाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ऋतुजा लटके यांच्या यशानंतर दुसरी आनंद साजरा करण्याची संधी दिली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिरपूर पदाधिकारी व शिवसैनिकांनी बबळाज जल्लोष फटाके फोडून आनंद साजरा केला. याप्रसंगी जेष्ठ शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा, ग्रामपंचायत सदस्य देवा जाधव  माजी उपतालुकाप्रमुख दिलीप चौधरी, उपतालुकाप्रमुख नारायण गवळी , गटप्रमुख नानासाहेब गुजर, पिंटू शिंदे, जिल्हा महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र भाऊ पाटील, महाराष्ट्र वाहतूक सेना तालुका अध्यक्ष विजय चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना नन्ना भाऊ , जावेद भाई शेख शिरपूर शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना,उपतालुका अधिकारी युवा सेना जितेंद्र राठोड, शोएब मण्यार, दानिश शेख, तन्वीर सय्यद, मोबीन शहा, अविनाश गुंजार, समीर शहा, अनिल पिंजारी, समीर सय्यद, माजीद शेख, रियान शेख ,मोहम्मद शेख, अरबाज शेख , राहुल राठोड आधी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि जल्लोषात आनंद साजरा केला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने