नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे अवैध ताडी विक्री करणाऱ्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी अचानक धाड टाकून बनावट ताडी आणि ती बनविणाऱ्यास मुद्देमालासह अटक केली आहे.*
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण , विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ, राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार यांच्या पथकाने विसरवाडी पोलिस ठाणे यांच्या मदतीने दिनांक १ नोव्हेंबर रोजी खांडबारा गावात अवैध ताडी विक्रेत्यांवर धाड टाकून ४ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूबंदी गुन्ह्यातील सदरचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचनामा करून जप्त करण्यात आला. तसेच घटनास्थळावरुन १) सत्यवती राजकोंडा २) राजकोंडा चीनाय्या ३) जेरीपुटला श्रीनिवास सत्त्या ४) जेरीपुतला विनोदा श्रीनिवास ४ आरोपींना अटक करण्यातआली.
सदरची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार, प्रभारी निरीक्षक पी. एस.पाटील, साहाय्यक दुय्यम निरीक्षक मोहन पवार, हंसराज चौधरी, संदीप वाघ, राजू पावरा, महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रिया मोरे वाहन चालक मानसिंग पाडवी यांच्या पथकाने केली असून पुढील तपास निरीक्षक पी. एस.पाटील हे करीत आहेत.
तर अवघ्या दोनच दिवसात पुन्हा अवैध ताडी व्यवसाय जोमाने सुरू असल्याने खांडबारा येथे दि. ३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा कारवाईत नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई खांडबारा गावात अवैध ताडी विक्रेत्यांवर धाड टाकून १५ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूबंदी गुन्ह्यातील सदरचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचनामा करून जप्त करण्यात आला. तसेच घटनास्थळावरुन सत्यवती रजकोंडा व राजकोंडा चीनाय्या सत्त्या असे दोन आरोपींना अटक करण्यात आली.
सदरची कार्यवाही उपविभागाचे उप आयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.एस. चव्हाण ,दुय्यम निरिक्षक व्ही.एम. पाटील ,ए.जी. सराफ जवान शिंदे, गायकवाड , घुले यांचे पथकाने केली आहे. मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ ई. नुसार कारवाई करण्यात आली आहे.
