नवापूर शहरात तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




नवापूर शहरात तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला या विवाह सोहळ्याला जुने महादेव गल्ली व महाराणा प्रताप चौक परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली.* 

कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावले जातात. वरुण राजाला निरोप देऊन शिशिराचे आगमन होते. त्यानंतर लग्नाच्या मुहूर्ताला ही प्रारंभ होतो असाच एक तुळशीविवाह जुनी महादेव गल्लीतील शरद पाटील व अशोक राणा यांच्या घराच्या  प्रांगणात पार पडला. तुळशीला वधूच्या रूपात तर शालिग्राम भगवान वर रुपी सजवून या तुळशी विवाह सोहळ्यात पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळा प्रमाणे मांडणी करून अंतरपाट घालून लग्न लावण्यात आले. यावेळी वर पक्षाकडून सौ. ज्योती व योगेश पाटील तर वधु पक्षाकडून सौ. अंकीता व विशाल पाटील यांनी पुजन केले. पौरोहित्य योगेश पाथरकर यांनी विधीवत पूजा करून मंगलाष्टके म्हणून तुळशी विवाह सोहळा लावण्यात आला.
याप्रसंगी शरद पाटील, अशोक राणा, विनायक पाटील, संजय पाटील, प्रशांत राजपूत, अल्पेश राजपूत, राजु राणा, निलेश पाटील, विशाल पाटील, कौशल टिभे, अविनाश पवार, प्रदिप राजपूत, राज राणा, अरविंद ब्रम्हे, भाविण राणा, मनिष राणा, कृष्णा पाटील, अमोल पाटील, राहुल टिभे, यश राजपूत, शूभम पाटील यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने