पुणे:महिलेशी जवळीक साधत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करणे महिलेने बंद केले. त्यावरून चिडलेल्या इसमाने महिलेच्या पतीला फोन करून महिलेची बदनामी केली.तसेच धमकी देऊन त्यांच्या दोन वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना चाकण एमआयडीसी मधील भांबोली ( ता. खेड ) येथे घडली. सुजित स्वाईन (वय 33, रा. वराळे, ता. खेड, पुणे ) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने महाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली आहे.
महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.
%20(1).jpeg)