शिरपूरचा पैलवान अक्षय माळी यास सुवर्णपदक विद्यापिठाच्या उत्तर महाराष्ट्र संघात निवड



शिरपूर - किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एस पी डी एम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरपूर चा खेळाडू पैलवान अक्षय  भटू माळी याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता त्याची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड झाली. 



सदर स्तुत्य निवडीबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नामदार डॉ तुषार भाऊ रंधे सचिव नानासाहेब निशांत रंधे खजिनदार श्रीमती आशाताई रंधे संस्थेचे विश्वस्त बाबासो रोहित रंधे, आबासाहेब राहुल रंधे, एसपीडीएम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एस एस राजपूत, उपप्राचार्य डॉ. फुला बागुल, डॉ एस पी महिरे, डॉ.दिनेश भक्कड, क्रीडा संचालक डॉ. एल के प्रताले, प्रा. राधेश्याम पाटील आदींनी त्याचे अभिनंदन केले


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने