संजिवनी हेल्पिंग हॅन्ड फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फराळ वाटप*




शिरपूर- तालुक्यातील उमर्दा या गावात  संजिवनी हेल्पिंग हॅन्ड फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व  फराळ वाटप करण्यात आले.

सदर उपक्रमासाठी विजय सर, सामाजिक विकास केंद्र मुंबई, प्रो.डॉ. प्रभा तिरमारे,  सहयोगी प्राध्यापक निर्माण निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्कर ,मुंबई,  प्रो. डॉ. गीता बालाकृष्णन सहयोगी प्राध्यापक निर्माण निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्कर ,मुंबई, रजनी देशमुख मैडम , मरीना फर्नांडिस मैडम, रोहिणी जगदेव मैडम या सर्वांनी संस्थेला मदत केली त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल पावरा व उपाध्यक्ष संगीता बलिद संजीवनी हेल्पिंग हँड फाऊंडेशन कडून त्यासाठी आभार मानले.

         अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे श्री. खंडू गुलवणे ग्रामपंचायत सदस्य, संस्थेचे ट्रस्टी श्रीमती टीमकाबाई फिरंया पावरा होते व आदिवासी कुलदेवी देवमोगरा माता या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या हस्ते व ट्रस्टी श्रीमती टीमकाबाई, ज्योती पावरा  मॅडम व करीना पावरा हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन आनी फराळ वाटप केले व मुलांना बाल अधिकार या विषय थोडक्यात अनमोल मार्गदर्शन केले. संजिवनी  हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनच्या माध्यमतून  कार्यक्रम राबवण्यात आला.  

 तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पावरा  मॅडम व शेवटी आभार प्रदर्शन  करीना मॅडम यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने