भविष्यातील निवडणुकांचा वेध घेत पुनमचंद मोरे यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष बांधणीसाठी संघटन सुरू.
शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष पुनमचंद मोरे यांच्या कामकाज करण्याच्या पद्धत, तालुक्यातील जनतेशी असलेला जनसंपर्क, दिल्या शब्दानुसार काम पूर्ण करण्याची पद्धत यामुळे तालुक्यातील युवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आकर्षित होत आहेत. चार दिवसापूर्वीच शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तर आज तालुक्यातील नांदेड येथील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यातून पुनमचंद मोरे यांनी भविष्यातील येणाऱ्या निवडणुकांचा वेध घेत पक्षाची बांधणी व मजबुद्दीकरण सुरू केले याची चर्चा सर्वत्र होऊ लागले आहे.
आज दि. २० नोव्हेंबर रोजी शिरपूर तालुक्यातील नांदेड गावातील बंजारा समाजाच्या युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला यात. सुनील जाधव, दीपक बंजारा, चेतन जाधव, लक्ष्मण राठोड, कपिल राठोड, योगेश राठोड, चंदू जाधव, राहुल जाधव, पवन जाधव, शुभम पवार, रवींद्र राठोड, राजाराम जाधव, राहुल राठोड, प्रवीण राठोड, अजय पवार, योगेश पवार, निलेश पवार, विशाल जाधव, इत्यादी तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, यांनी व शिरपूर तालुकाध्यक्ष पुनमचंद मोरे, यांनी स्थानिक समस्येची जाणीव करून देत त्या कशा सोडवता येतील याबाबत व राजसाहेब आणि पक्षाचे विचार घराघरात पोहचवावा याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष राकेश नवनीत चौधरी, मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष सोनू राजपूत, तालुका उपाध्यक्ष अजय सोनवणे, तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, ता.सहसचिव अमोल गुजर,आदी उपस्थित होते.

