आज दिनांक 21/ 11/ 2022 रोजी जि. प. शाळा खलाणे या ठिकाणी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत आदर्श शाळा कार्यक्रम टप्पा 2 अंतर्गत शालेय तपासणीसाठी आलेल्या जिल्हास्तरीय कमिटीचे सहर्ष स्वागत करण्यात आले.या कमिटी अंतर्गत VSTF जिल्हा समन्वयक श्री.विशाल नागनाथवार सो. शिक्षण विस्तार अधिकारी सो. श्रीमती रणदिवे मॅडम, शिंदखेडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील सो., चिरणे बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी सो. श्रीमती शैलजा शिंदे यांचा समावेश होता. कमिटीतील सर्व अधिकाऱ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत डिगराळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्रीमती रणदिवे मॅडम व श्री विशाल नागनाथ वार सो. यांनी व्हीएसटीएफ आदर्श शाळा कार्यक्रमांतर्गत शाळा विकास आराखड्यास लागणाऱ्या व आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची विभागवार मार्गदर्शन केले व त्यासाठी आवश्यक निधी बाबतही मार्गदर्शन केले. उपशिक्षक श्री राजेंद्र पाटील यांनी व्हीएसटीएफ अंतर्गत जि. प. शाळा खलाणे येथे आवश्यक भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण या उपक्रमांसाठी एलईडी टीव्ही, डिजिटल साऊंड सिस्टिम, संगणक संच व रंगरंगोटी या बाबींची आवश्यकता असल्याबाबत सांगितले.
साई कन्स्ट्रक्शन चे संचालक श्री नाना भामरे व शा. व्य. समिती अध्यक्ष भुरेसिंग गिरासे यांनी लोकसहभागातून शाळेस वेळोवेळी मिळणाऱ्या सर्व लाभांविषयी व भावी योजनांविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी सर्व अधिकारी वर्गाने शाळा व परिसराचे निरीक्षण करून वर्ग, भौतिक सुविधा, संगणक कक्ष, डिजिटल वर्ग, मुख्याध्यापक दालन, शौचालय, किचन, शालेय परसबाग , सरस्वती मंदिर यांचे निरीक्षण करून समाधान व्यक्त केले व यापुढेही शाळेस आवश्यक असलेल्या गरजांसाठी पाठपुरावा करून राज्य पातळीवर शाळा नेता येईल यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. गावातील ग्रामपंचायतला देखील त्यांनी सदिच्छा भेट दिली. सर्व मान्यवर अधिकाऱ्यांचे शाळेतील उपशिक्षक श्री अतुल खोडके सर यांनी आभार मानले.
Tags
news
