महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत आदर्श शाळा टप्पा -२ अभियानाची शाळा व गावस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी* दोडाईचा (अख्तर शाह)



 साठी जि. प.शाळा उभरांडी शाळेला महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत अभियानात कार्यरत जिल्हा कार्यकारी अधिकारी श्री विशाल नागनाथवार, तथा मा. श्रीमती अनिता सोनवणे (माध्य.शि.वि.अ.जि.प.धुळे) यांनी दि.22 नोव्हें रोजी भेट दिली. भेटीदरम्यान  पथकातील अधिकाऱ्यांनी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच व ग्रामस्थ यांच्याशी शाळा विकास आराखड्यातील मुद्द्यांबाबत चर्चा करून त्याविषयी मूल्यांकन अहवाल आणि शाळा विकास अंदाजपत्रक तयार करण्यात आले. आदर्श शाळा विकास कार्यक्रम अंतर्गत शाळेला अभियान मार्फत शाळा विकासासाठी 3 लाख रू निधी प्राप्त होणार असून विकास आराखड्यानुसार तो निधी वापरता येणार आहे असे पथक मार्फत सांगण्यात आले. पथकासोबत साक्री तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री राजेंद्र पगारे, दुसाने भागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री व्ही.व्ही.पवार, लोनेश्र्वरी भागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री गवळी, दुसाने केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री धनराज मुजगे हे उपस्थित होते.
                *धुळे जिल्हा परिषदेच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती एस भुवनेश्वरी मॅडम यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून, धुळे जिल्ह्याचे प्राथ. शिक्षणाधिकारी मा.श्री राकेश साळुंखे साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. श्री राजेंद्र पगारे साहेब, दुसाने भागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री व्ही.व्ही.पवार, केंद्रप्रमुख मा.श्री धनराज मुजगे यांच्या मार्गदर्शनातून,  शाळेचे शिक्षक ग स बँकेचे संचालक व नंदुरबार विभागीय चेअरमन श्री प्रकाश बच्छाव यांच्या प्रयत्नांनी सुरू असलेल्या शाळेच्या लोकवर्गणीतून केलेल्या कामांविषयी पथकातील अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करून अभियानासाठी योग्य शाळेची निवड करण्यात आल्याचे प्रतिपादन केले.
                  *प्रसंगी गावाचे सरपंच मा. श्री नारायण सावळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष सावळे, शाळेचे पदो.मुख्याध्यापक श्री सदाशिव पाटील, शाळेचे शिक्षक ग स बँकेचे संचालक व नंदुरबार विभागीय चेअरमन श्री प्रकाश बच्छाव, श्री सुनिल जाधव, श्री वसंत तोरवणे, श्रीमती कावेरी सोनवणे, श्री विजय न्याहळदे, उपाध्यक्ष श्री प्रभाकर वाघ,  शा.व्य. स.चे सदस्य श्री राजू वाघ, श्री धनराज शेलार, श्री ईश्वर सावळे, श्री शांतीलाल शेलार, श्री चूनिलाल धानोरे, श्रीमती मनिषा अहिरे, श्रीमती मनीषा शेलार, श्रीमती मनिषा सावळे, श्रीमती भुरीबाई बागले, श्रीमती वर्षा सोनवणे, तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने