थाळनेर महाविद्यालयातर्फे बिरसा मुंडा यांना अभिवादन*



थाळनेर प्रतिनिधी-शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील  कै. अण्णासाहेब पितांबर शंकर वाडिले कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक मंडळाच्या   वतीने  १५ नोव्हेंबर रोजी धरती आबा वीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने  अन्नपुर्णादेवी विद्या प्रसारक संस्थेचे सचिव मा. आप्पासो. श्री.निळकंठ वाडीले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर . जगताप होते.    कार्यक्रमाचे  प्रमुख वक्ते डॉ. जी. जे. गावित आपल्या मनोगतात म्हणाले की,  इंग्रजांनी आदिवासींना जंगलातून बेदखल केले. त्यांच्या जल, जंगल, जमिनीवर अधिकार गाजविले. तेव्हा बिरसा यांनी आदिवासींना संघटित केलं. अपनी धरती, अपना राज असा नारा देत जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजांविरुद्ध विद्रोह केला.  बिरसा मुंडा यांनी जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी बलाढ्य ब्रिटिश सरकार सोबत अभूतपूर्व संघर्ष केला. बिरसा मुंडा यांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी ब्रिटीशांवर हल्ले केले आणि सरंजामशाही व्यवस्थेला विरोध केला. त्यामुळे आदिवासी समुदाय  त्यांचा धरती आबा म्हणून गौरवोदगर करू लागले.  बिरसा यांनी आयुर्वेद समजून घेतलं. औषधी विज्ञानात ते पारंगत झाले. रुग्णांची सेवा करू लागले.  अल्पावधीतच त्यांची कीर्ती दूरवर पसरली. आदिवासी समुदायासाठी ते ईश्वरा समान ठरू लागले. ते लोकांसाठी भगवान बिरसा मुंडा झाले. पुढे बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली. कैदेत असताना वयाच्या २५ व्या वर्षी ९ जून १९०० मध्ये बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाला. दरवर्षी १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाते. सध्याचे झारखंड राज्यात रांची येथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.  प्राचार्य डॉ. जगताप आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, बिरसा यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आजही  जंगल जमीन वाचविण्यासाठी व्यापक स्तरावर कार्य करण्याची गरज आहे.  खोटे बोलू नका, घर स्वच्छ ठेवा, निसर्ग वाचवा हे त्यांचे विचार अंगिकरणाची गरज आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा. एम. डी. रणदिवे तर आभार  सहायक कार्य. आधिकारी प्रा. व्ही. डी.  झुंजारराव यांनी मांडले. कार्यक्रमाला , ग्रंथपाल श्री.हितेंद्र माळी, प्रा. एस. एस. राठोड, प्रा. आर. के. सोनवणे, श्री. नवनीत वाडीले,  श्री. गंगाधर राजपूत, श्री. विजय मराठे, श्री. अशोक भोई, श्री. मनिष थोरात व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने