*बोराडी येथे श्रमदानातून सायकल ट्रॅक व पाथ - वे निर्मिती.*




बोराडी ता.शिरपूर बोराडी ग्रामपरिषदेने माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये सहभाग घेतला असुन या माध्यमातून पर्यावरणविषयक वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र विद्युत महावितरणच्या कार्यालय परिसराला लागून  झुडपे वाढली होती.तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडपे वाढल्याने पायी चालतांना  नागरिकांना त्रास होत होता.त्या सोडवण्याच्या दृष्टिने माझी वसुंधरा अभियान माध्यमातून स्वच्छता राबविन्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच या भागात फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी मॉर्निंग वॉक रस्ता करण्यासाठी पाथवे व सायकल ट्रॅक वापरता यावे,हा मार्ग स्वच्छ व्हावा,पाथवे तयार व्हावा म्हणून सदर अभियान राबविण्याचा संकल्प पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तसेच बोराडी गावाचे उपसरपंच राहुल रंधे  यांनी घेतला होता.
त्यानुसार आजपासून सकाळच्या वेळेस लोक सहभागातून हे अभियान सुरु करण्यात आले.या स्वच्छता मोहिम करिता स्व:ता राहुल रंधे यांनी पुढाकार घेतल्याने आज सकाळी लोक सहभागासाठी बोराडी येथील लोकांनी  बोराडी शिरपूर रस्त्यावरील पाथवे व सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी श्रमदान केले. प्रदुषण होऊ नये म्हणुन ग्रामपरिषद मार्फत गाड्यांऐवजी सायकल वापरा अशी जनजागृती करण्यात येत आहे.बोराडी ग्रामपरिषदेने कचरा संकलनसाठी ईलेक्ट्रिक कचरागाड्या घेतल्या आहेत.यावेळी
योगेश पाटील,प्रा.पंकज पाटील,संदिप पवार,
भगवान निंबाळकर,विजय गोसावी,अविनाश सत्तेसा,परेश बडगुजर,अनंत सैंदाणे,देवा सोनवणे,जगदीश पाटील,शरद पवार,मुकेश जाधव इ.उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने