शहादा पोलिसांनी आरोपींच्या पाठलाग करून दमदार अशी कामगिरी केली असून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनास जप्त करून 19 लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमाल व जवळपास 5 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 24 लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र या कारवाईत अंधाराच्या फायदा घेत तीन आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अवैद्य दारूची वाहतूक करत असलेल्या पिकप वाहनाने शहादा पोलीस स्टेशनच्या गस्तीवर असलेल्या व पाठलाग करत असलेल्या जीप ला जोरदार कट मारून पोलीस वाहनास अपघात करण्याच्या प्रयत्न केला पण वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवत वाहनातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीव वाचवला व संशयित पिकप वाहनाच्या पाठलाग केला. सदर वाहनास थांबवण्याच्या प्रयत्न केला असता वाहन चालकाने म्हसावद रस्त्याच्या दिशेने पलायन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी म्हसावद पोलिसांची संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तात्काळ म्हसावद पोलिसांच्या पथकाने शहादा रस्त्यावर पोलीस गाडी आडवी लावली मात्र पिकप वाहन चालकाने पोलीस गाडीला ठोस मारून तोरणमाळ रस्त्याकडे पळ काढला. यावेळी शहादा व म्हसावद या दोन्ही पोलिसांच्या पथकाने या गाडीच्या पाठलाग केला परंतु तोरणमाळ घाटात दारूच्या खोक्यांनी भरलेले वाहन चदू न शकल्याने अंधाराचा व घाटाच्या फायदा घेत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्या पोलिसांकडून शोध सुरू आहे.
दरम्यान पोलिसांनी दारूच्या खोक्यांनी भरलेले पिकप वाहन क्रमांक एम एच 18-8995 जप्त केले त्यात दारूचे 250 खोके व त्यात असलेला एकोणवीस लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमाल व पाच लाख रुपयांचे वाहन असा एकूण 24 लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून पोशि अनमोल अमसिंग राठोड वय ३२ नेमणूक शहादा पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार ,पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत ,पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाडवी ,किरण पवार, दिनकर चव्हाण, मणिलाल पाडवी, मुकेश राठोड, किरण माळी, भरत उगले यासहमसावत पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल बहादूर भिलाली सचिन वसावे इत्यादी च्या पथकाने केली आहे.
