स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे अन् कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांनी श्रद्धांजली वाहून अभिवादन केलं.
आपल्या संदेशात ना. शिंदेसाहेब म्हणतात," शतकानुशतके अज्ञानाच्या अंध:कारात गुलामगिरीचं जीवन जगणाऱ्या भारतीय
स्त्रियांना शिक्षणाची कवाडं खुली करून देण्याचं महान कार्य ज्योतिबा फुले यांनी केलं,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.*जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगताते उद्धारी*,या शब्दांत फुलेंनी जनमानसाला *स्त्री महात्म्य* विशद केल़ं,याची आठवण ना.शिंदेसाहेबांनी यावेळी करून दिली.
शिक्षणाचा अभाव हे बौद्धिक गुलामगिरीचं मुळ कारण असल्याने समाजातून निरक्षरता दूर केल्यास,गरिबी व जातीभेद संपुष्टात येऊन सर्वांना आपल्या हक्काची फळे चाखायला मिळतील,असा मोलाचा संदेश ज्योतिबांनी महिला,शेतकरी व कामगारांना दिल्याचे ना.शिंदेसाहेबांनी यावेळी आवर्जून सांगितले.
स्त्री शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी ज्योतिबांनी सर्वप्रथम आपली पत्नी सावित्रीबाईंना शिक्षित केलं.त्यानंतर १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात पहिली मुलींच्या शाळेची मुहूर्तमेढ केली अन् तेथूनच भारतात स्त्री शिक्षणाचं नवं पर्व सुरू झालं.अन् हीच शाळा पारतंत्र्याच्या काळातली देशातील पहिली मुलींची शाळा ठरली,हे महाराष्ट्राच्या दृष्टीने भूषणावह आहे,असे गौरवोद्गार खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांनी याप्रसंगी काढले. ज्योतिबांच्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे सर्वंकष धोरण पुढील कालखंडात छ्त्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तर,सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या बडोदा संस्थानात प्राधान्याने राबविले,याचे स्मरण डॉ.श्रीकांतजी शिंदे यांनी याप्रसंगी करून दिलं.इतकेच नव्हे तर,महाराष्ट्र सरकारने देखील ज्योतिबांच्या पावलावर पाऊल टाकत मोफत प्राथमिक शिक्षणाचा✍️धडा राज्यात गिरवला. खरं तर,हीच त्यांना मराठी जनमानसाची मानवंदना आहे.सामाजिक न्यायाचे प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्त ठाणेकरांचे त्रिवार वंदन
