08 ट्रॅक्टर ट्रॉल्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला ट्रॅक्टरसह नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पथकाने ठोकल्या बेडया नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

 


नंदुरबार - तक्रारदार श्री. युवराज उत्तम प्रजापती, रा. धुळे रोड, नंदुरबार ता. जि. नंदुरबार यांचे मालकीची 70,000/- रुपये किंमतीची एक लाल रंगाची शक्तीमान कंपनीची ट्रॅक्टरची ट्रॉली क्रमांक MH-39-F-5519 व चेसीस क्रमांक DTD254/2010 ही दिनांक 08/09/2022 रोजी नंदुरबार शहरातील जे. के. पार्क राजपुत पेट्रोलपंप जवळील सिद्धी ट्रेडर्स दुकानासमोरुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली म्हणुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं. 582/2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता..

सदरचा गुन्हा हा शेतकऱ्यांशी निगडीत असल्यामुळे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर तसेच उपनगर पोलीस ठाणेचे सहा पोलीस निरीक्षक, दिनेश भदाणे यांना आदेशित केले. नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना गुन्हयातील चोरीस गेलेली ट्रॉली व सदर ट्रॉली चोरणारा इसम हा जिल्हा रूग्णालय, नंदुरबार परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक/विकास गुंजाळ व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांचे पथक तयार करुन पोलीस पथकाला त्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या. नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस पथकाने जिल्हा रुग्णालय, नंदुरबार परिसरात सापळा रचला असता संशयीत आरोपी हा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह येत असतांना दिसुन आला, पोलीस पथकाने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता संशयीत आरोपी हा चालत्या ट्रॅक्टरमधून पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे सुरवातीला विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यानंतर त्यास नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आणुन विश्वास्त्रत घेवुन विचारपुस करता त्याने त्याचे नाव गाव 1) अरुण सुकलाल वळवी, वय 27 वर्षे, रा. खामगांव, ता. जि. नंदुरबार असे सांगुन त्याने ट्रॅक्टरची ट्रॉली चोरी केल्याची माहिती दिली. सदरची ट्रॉली ही 70,000/- रुपये किंमतीची लाल रंगाची शक्तीमान कंपनीची असुन त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.न. 582/2022, भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 08/09/2022 रोजी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदरची ट्राली ही कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केली.

तसेच त्याचेकडे अधिक विचारपुस करता त्याने आणखीन 07 ट्रॉल्या चोरी केल्याची माहिती दिली. सदरच्या ट्रॉल्या देखील कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या त्याचे वर्णन खालीलप्रमाणे,

1 ) 55,000/- रु. किं.ची. लाल रंगाची ट्रॅक्टरची ट्रॉली त्याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे दिनांक 28/06/2022 रोजी गुरनं. 158/2022 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल दिनांक

2) 40,000/- रु. कि.ची. लाल रंगाची ट्रॅक्टरची ट्रॉली त्याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे 15/07/2022 रोजी गुरनं. 173/2022 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल 3) 80,000/- रु. कि.च्या दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या त्यात एक नारंगी व एक गेरु कलरची त्याबाबत

उपनगर पोलीस ठाणे येथे दि 24/10/2022 रोजी गुरनं 293/2022 भादवि कलम 379

प्रमाणे दाखल 4) 90,000/- रु. कि.ची. एक निळया रंगाची ट्रॅक्टरची ट्रॉली

5) 90,000/- रु. कि.ची. एक निळया व तपकीरी रंगाची ट्रॅक्टरची ट्रॉली 6) 55,000/- रु.कि.ची. एक निळया रंगाची ट्रॅक्टरची ट्रॉली

7) 4,50,000/- रु. कि. चे ट्रॅक्टर क्रमांक MH-15-GF-3071 गुन्हा करतांना आरोपीने वापरलेले.

अशाप्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाणे येथे वरील दाखल गुन्हयांमध्ये वरील वर्णनाच्या व 4,80,000/- रुपये किंमतीच्या एकुण 08 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या व 4,50,000/- रुपये किंमतीचा 01 ट्रक्टर असा एकुण 9,30,000/- रु. कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे. तसेच सदर कारवाईत आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नसुन आणखीन ट्रॅक्टर ट्रॉली हस्तगत होवु शकतात असे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले आहे तसेच त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.

सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील सो., नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे साो. यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोहेकॉ अतुल बिऱ्हाडे, पोहेकॉ / जगदिश पवार, पोहेकॉ / संदिप गोसावी, पोना/भटु धनगर, पोना/बलविंद्र ईशी, पोना/स्वप्निल पगारे, पोना / स्वप्निल शिरसाठ, पो. शि/अनिल बडे, पोशि/ विजय नागोडे, पोशि/ इम्रान खाटीक, पोशि/ कल्पेश रामटेके, पोशि/ युवराज राठोड, पोशि/ योगेश जाधव, पोशि/ हेमंत बारी यांच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने