एकतर्फी प्रेमातून औंधला तरुणीचा खून , आरोपीने मुळशीत घेतला गळफास प्रतिनिधी दत्ता पारेकर

 



पुणे: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करून फरार झालेल्या आरोपीने अखेर मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ गळफास घेतलेला आहे. प्रतीक ढमाले असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याने श्वेता विजय रानवडे हिचा खून केला होता.



श्वेता आणि त्याचे प्रेमसंबंध होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे पटत नव्हते. श्वेता ही तिच्या बहिणीसोबत औंध भागात चाललेली असताना प्रतीक याने तिला गाठून तिच्यावर चाकूने वार केले होते त्यानंतर तो तिथून फरार झाला. सदर घटनेत श्वेता हिचा मृत्यू झाला तर पोलिस दुसरीकडे प्रतीक याचा शोध घेत होते. पोलिसांची दहा पथके त्याच्या मागावर होती मात्र दहा तारखेला सकाळी त्याने मुळशी तालुक्यातील काटा धरणाजवळ गळफास घेतलेला आढळून आला.


श्वेता रानवडे (वय 22, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रतीक ढमाले, त्याचे वडील किसन ढमाले (वय 50) आणि प्रतीक याचा मित्र रोहित (वय 27) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याबाबत पीडित मुलीची आई दीपाली विजय रानवडे (46, सिद्धार्थनगर, औंध) यांनी फिर्याद दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने