शिरपूर : येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख प्रा.आर.पी.महाजन यांना जळगाव येथील क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे प्र. कुलगुरू डॉ.एस.टी.इंगळे यांच्या हस्ते पीएच.डी. नोटीफीकेशन प्रदान करण्यात आले.
त्यांनी “सम प्रोब्लेम्स इन द थेयरी ऑफ फ्र्याकशनल इंटीग्रोडीफरनशीयल इकवेशंस विथ नॉन लोकल कन्डीशंस” या विषयावर शोध प्रबंध सादर केला. त्यांना स्कूल ऑफ मेथेमेटीकल सायन्स क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ.एच.एल.तिडके यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना स्कूल ऑफ मेथेमेटीकल सायन्स क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डायरेक्टर डॉ. श्रीकांत चौधरी, विभाग प्रमुख डॉ.किशोर पवार, डॉ. सी.टी.आगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी आपला शोध प्रबंध आई कै. सीताबाई पंढरीनाथ महाजन यांना समर्पित केला.
त्यांचे माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.आर.पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.एम.पाटील, डॉ. आर.डी.जाधव सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
