आरोग्य विभागाच्या वतिने दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला व त्याअनुषंगाने जागतिक मानसिक आरोग्य जनगृती सप्ताह साजरा केला जात आहे.
शिरपूर तालुका आरोग्य विभागाने तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व प्रा.आ.केंद्र स्थित सर्व केडर आरोग्य कर्मचारीवर्ग यांच्यासाठी एक अनोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व अधिकारी ,कर्मचारीवर्ग यांचे स्नेहसंम्मेलन या निमित्ताने पार पडले.
शिरपूर तालुका आमदार सो काशीराम जी पावरा यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.आणि तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारीवृंद यांना सक्षम आरोग्यदुत म्हणून सन्मानित करण्यात आले.कोव्हिड काळात व त्यानंतर शिरपूर तालुक्यातील आरोग्य कर्मचारीवर्ग यांचे काम समाधानकारक असुन भविष्यातही अशीच आरोग्य सेवा देत रहा आशी अपेक्षा आमदार सो यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डाॅ.प्रसन्न कुलकर्णि तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.कामाच्या व्यापात असणार्या कर्मचारीवर्ग यांना हे स्नेहसंम्मेलन निश्चितच चांगले बळ देईल असे त्यांनी मत व्यक्त केले.
आजच्या कार्यक्रमात श्रीमती कल्याणी देशमुख,श्रीमती बोरसे मॅडम व श्रीमती सोनवणे खर्दे यांनी आरोग्य विषय घेवुन अतिशय छान रांगोळी काढल्यात.
प्रथम सत्रात स्वरगंध गायन टिम यांनी मंत्रमुग्ध अशा भक्तिमय गाण्यांची मेजवानी सादर केली.श्री.लोहार सर,श्री गरुड सर,श्री राजपुत सर व त्या सर्वांना साथ लाभली ती श्री निळ नाना आरोग्य सहाय्यक यांची.
दुसर्या सत्रात डाॅ.मिलिंद बचुटे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट यांनी तणावमुक्त जिवन कसे जगावे याची उत्तम कार्यशाळा सर्व कर्मचारीवर्ग यांची घेतली.
कार्यक्रमाच्या तिसर्या सत्रात सर्व कर्मचारीवर्ग यांनी आपले कलागुण सादर केलेत.गितगायन, भारूड,स्टेजडान्स ,कविता,आदि सादर केलेत.
सदर कार्यक्रम तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी स्वेच्छेने आयोजित केलेला होता.डाॅ.राष्ट्रपाल अहिरे,श्री प्रकाश वाघ,श्री संतोष पावरा,श्री सुनिल भवर,श्री फुलपगारे नानासाहेब,श्री नगराळे नानासाहेब, श्री छगन वाघ यांनी सर्व अधिकारी व कर्मचारीवर्ग यांच्या सहकार्यातून सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केलेत.
सदर कार्यक्रमास कर्मचारी संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री डि.ए.पाटिल व त्यांचे सहकारी उपस्थित होते.त्यांनी शिरपूर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी वर्गांचे आभार व्यक्त केलेत.व महाराष्ट्रात प्रत्येक तालुका स्तरावर अशा स्नेहसंम्मेलनाची काळाची गरज आहे अशा भावना व्यक्त केल्यात.डाॅ.अभिजित पाटील यांनी तणावयुक्त राहुन आयुष्याचा शेवट करु नका अशी विनंती केली. डाॅ.मंगेश निकम यांनी आभार मानले.
डाॅ.प्रसन्न कुलकर्णि,डाॅ.राष्ट्रपाल अहिरे,डाॅ.प्रितम माळी,डाॅ.सुनिल पावरा,डाॅ.मनोज पाटील, डाॅ.पुनम बडगुजर, डाॅ.अभिजित पाटील,डाॅ.संदिप गिरासे,डाॅ.मंगेश निकम,डाॅ.बन्सिलाल पावरा,डाॅ.विरल पाटिल आदि वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
Tags
news
